Thursday, April 25, 2024
Homeनगरगोंधवणीच्या तरुणाची गोंडेगाव येथे सासुरवाडीस येऊन आत्महत्या

गोंधवणीच्या तरुणाची गोंडेगाव येथे सासुरवाडीस येऊन आत्महत्या

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे सासुरवाडीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत मयताचा भाऊ किरण गोरक्षनाथ दांगट (वय 39) रा. भेर्डापूर ता. श्रीरामपूर याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी भेर्डापूर येथे शेती करत असून मला माझ्या मामाने दत्तक घेतल्याने तिथे राहतो. माझे मूळ गाव गोंधवणी, ता. श्रीरामपूर हे असून तिथे माझे दोन भाऊ माझ्या आई-वडिलांकडे राहतात. माझे मूळ नाव किरण ज्ञानदेव लबडे असे आहे. मला दोन भाऊ आहेत.

माझा लहान भाऊ रवींद्र ज्ञानदेव लबडे (वय 35) याची सासुरवाडी नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील असून 17 नोव्हेंबर रोजी तो गोंडेगाव येथे सासुरवाडीला कार्यक्रमासाठी आलेला होता. या दिवशी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास माझ्या मावस मेव्हण्याने मला फोन करून कळविले की, रवींद्र ज्ञानदेव लबडे याने गोंडेगाव येथे त्याच्या सासर्‍याच्या घराजवळ काही अंतरावर लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 134/2022 भारतीय दंड विधान कलम 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या