Friday, April 26, 2024
Homeनगरगोंधवणी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

गोंधवणी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या गोंधवणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

- Advertisement -

जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर व माजी आ. भानुदास मुरकुटे, ज्येष्ठ मार्गदर्शक दिगंबर पाटील फरगडे यांच्या नेतृत्वाखाली गाव पातळीवर आपसात विचार विनिमय करून सोसायटीचे सर्व तेरा संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनियुक्त संचालक म्हणून मनोहर फरगडे, सचिन मोरगे, विलास गोराणे, बबन लबडे, मनसुख फरगडे, सखाहरी कांदळकर, विजय मोरगे, बाप्पू लबडे, राजेंद्र लबडे, प्रवीण शेळके, दिपाली फरगडे, मंदाताई फरगडे, संगीता लबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या 104 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. नवनिर्वाचित संचालकांचे दिगंबर पाटील फरगडे, सरपंच भारत तुपे, दादासाहेब शिर्के, संजय लबडे, नंदकिशोर लबडे, सूर्यकांत डावखर, कैलास गुलदगड, मयूर बोर्डे आदींनी अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या