Monday, April 29, 2024
Homeनगरगोंडेगावच्या शाळेला दोन मुख्याध्यापक

गोंडेगावच्या शाळेला दोन मुख्याध्यापक

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण वेळ मुख्याध्यापक असताना या शाळेेचे कामकाज मात्र प्रभारी मुख्याध्यापक पाहत आहेत.

- Advertisement -

या शाळेत पूर्ण वेळ मुख्याध्यापक म्हणून बापूसाहेब बोर्डे यांची शासकीय स्तरावरून नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु पूर्वी ज्यांच्याकडे अतिरिक्त मुख्याध्यापक पदाचा चार्ज होता ते शिक्षक आजही मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसून त्याच टेबलवर कामकाज करतात.

याबाबत मुख्याध्यापक श्री. बोर्डे यांना सरपंच व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ते पदवीधर शिक्षक इयत्ता 5 वी ते 7 वी वर्गासाठी इंग्रजी विषय शिकवितात. परंतु याबाबत पदाधिकार्‍यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला इंग्रजी विषय मॅडम शिकवितात. यानंतर पुन्हा श्री. बोर्डे यांना विचारले असता त्यांनी सदर शिक्षक रजेवर होते असे सांगितले.

आज रोजी शाळेला पूर्ण वेळ मुख्याध्यापक असूनही काही दिवसांपूर्वी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नेममलेले शिक्षक ऑनलाईनचे कामकाज करण्याच्या नावाखाली पूर्ण वेळ मुख्याध्यापक कार्यालयात बसून राहतात. दोन शिक्षक कार्यालयात बसले तर शाळेतील विद्यार्थीना कोण शिकवणार? असा प्रश्न ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, ग्रामस्थांना व पालकांना पडलेला आहे.

या शाळेतील जवळ जवळ सर्वच शिक्षकांनी करोनाच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांना सुध्दा अतिशय चांगल्या प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन शिकविण्याचे काम केले आहे. याठिकाणी आधीच पदवीधर भाषा विषयाचा शिक्षक कमी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या