Thursday, April 25, 2024
Homeजळगाव८५ लाखांचे सोने सात लाखांत घेतले अन्...

८५ लाखांचे सोने सात लाखांत घेतले अन्…

यावल – प्रतिनिधी Yaval

शहरातील विरार नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला एक किलो 700 ग्रॅम वजनाचे सुमारे ८५ लाख किंमतीचे सोने फक्त सात लाखात विकले…

- Advertisement -

मात्र हे सोने खरे नसून खोटे असल्याचे समजल्याल्यावर आपली फसवणूक झाल्याचे सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या कुटूंबास समजले तोपर्यंत त्या सोने विक्रेत्यांनी पोबारा केल्याची घटना घडली.

याबाबत यावल पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे

. शहरातील सेवानिवृत्त शिक्षक विरार नगर मधील रहिवाशी सुभाष धनाजी पाटील यांना आरोपी किसन व मुकेश नाव गाव पूर्ण पत्ता माहीत नाही यांनी दि.१२ ऑक्टोबर २०२० रोजी अकरा वाजता नवीन तहसीलदार कार्यालयाकडे सातोद कोळवद रोड वरील जिल्हा परिषद उर्दू शाळेकडे भेट अचानक झाली त्यांनी आम्हाला इमारतीचा पाया खोदताना सोन्याच्या मण्यांची माळ सापडलेली आहे ती विक्री करावयाची आहे असे सांगितल्याने सुभाष पाटील यांना लोभ सुटला त्यांनी सदरची माळा पाहिली व सदरच्या नकली असलेल्या सोने सोने असल्याचे भासवून आजच्या बाजार भावात त्याची किंमत 85 लाखाच्या जवळपास आहे ती सात लाखात भेटत असल्याने त्यांनी घरी येऊन घरच्या मंडळीशी चर्चा केली आणि सदर सोने विकत घेण्याचे ठरले दिनांक 12 ऑक्‍टोबर २० रोजी सुभाष पाटील यांना किसन व मुकेश ही भेटले होते आणि 24 तारखे पावेतो म्हणजे बारा दिवस तब्बल या सौद्यासाठी त्यांनी गड घातली व पैसे जमवायला वेळ लागतील याबाबत भुसावळ शहरातील डेनिम रेडिमेट शॉप पॉईंट जवळ व सातोद रोडवरील जिल्हा परिषद उर्दु शाळेजवळ सदर आरोपी सुभाष पाटील यांना बारा दिवस भेटत होते.

तोपर्यंत सुभाष पाटील यांनी कोणालाही वाच्यता केली नाही हे विशेष लोभ हा माणसाला कसा मोहवून टाकतो हे यातून समोर येते म्हणून त्यांना बारा दिवसाचा वेळ मिळाला सुभाष पाटील यांनी इतरत्र पैसे मित्रमंडळी कडून उधार उसनवार जमा केले व घरचे काही शिल्लक रक्कम जमा करून एकत्रित सात लाख रुपये तयार केले.

म्हातारपणात आपल्याला या व्यवहाराचा लाभ होईल ही लालसा व मुलाबाळांना भविष्यात यात निश्चितच त्यांचे जीवन सुखकर होईल ही आशा सुभाष पाटलांना झाली आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोने लुटण्याचा आनंद त्यांनी घेतला.

मात्र सदरचे सोने सोनाराकडे तपासणी करता नेले असता सोन्याचा आनंद असलेल्या सुभाष पाटील कुटुंबीयांवर तपासणीनंतर हे नकली असल्याचे समजताच किशोर व मुकेश यांनीच सुभाष पाटील यांना लुटून नेले हे सिद्ध झाले.

सुभाष पाटील सर घरच्यांची तोंडातील पाणी पळाले चेहऱ्यावरील हावभाव कोलमडून पडला आणि चक्क पोलीस स्टेशनचा रस्ता धरला दसऱ्याच्या दिवशी सदर गुन्ह्याबाबत यावल पोलीस स्टेशन मधील सुभाष धनाजी पाटील यांनी येऊन आप बीती सर्व हकीकत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना सांगितली आणि सदर बाबतीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

यावल पोलिसात भाग-5 गुरव 170 / 20 भा द वि 420, 406, 34 प्रमाणे किसन व मुकेश पूर्ण नाव गाव माहीत नाही या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हेड कॉन्स्टेबल मेहबूब तडवी यांनी दाखल करून फौजदार जितेंद्र खैरनार यांच्याकडे गुन्हा तपास करण्याची कामगिरी करण्याचे आदेश धनवडे यांनी दिले त्याप्रमाणे

लालसेपोटी सुभाष धनाजी पाटील व त्यांचे कुटुंबीय कसे या प्रकरणात लुबाडले गेले हे मात्र यावरून निश्चितच दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या