Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नरफाट्याजवळ पाच तोळे सोन्याची पोत लांबवली

सिन्नरफाट्याजवळ पाच तोळे सोन्याची पोत लांबवली

नाशिकरोड । Nashik

नाशिकरोड परिसरात असलेल्या सिन्नर फाटा परिसरातील भागवत मळा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची सोन्याची पोत लांबविण्याचा प्रकार घडला असून सदर महिलेचे नाव सुमन वाकचौरे असे आहे.

- Advertisement -

दुचाकी गाडी वर आलेले चोरटे सोन्याची पोत ओरबडून सुसाट वेगाने फरार झाले. या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी उशिरापर्यंत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या