Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारजाचक कायद्याविरोधात सुवर्ण व्यापारी पाळणार लाक्षणिक बंद

जाचक कायद्याविरोधात सुवर्ण व्यापारी पाळणार लाक्षणिक बंद

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेली हॉलमार्किंग Hallmarking प्रक्रिया, एच.यु.आय.डी. च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी Complicated and oppressive provisions आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील एचयुआयडीची तरतूद रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी दि.23 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांतर्फे Nandurbar District Goldsmiths सर्व सुवर्ण व्यापारी बंधु एक दिवसाचा लाक्षणिक बंद Symbolic closure पाळणार आहेत.

- Advertisement -

याबाबत महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार सराफ असोसिएशनतर्फे दि.23 ऑगस्ट रोजी सर्व सराफी दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.

अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया, कणखऊ च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील कणखऊ ला विरोध म्हणुन हा बंद पुकारण्यात येत आहे. या तरतुदीमुळे ग्राहकांना देखिल संपूर्ण जाचक तरतुदीला सामोरे जावे लागणार आहे.

सुवर्ण व्यापारी बंधुंचा हॉलमार्किंगला विरोध नाही परंतु त्याबाबत ज्या अडचणी व क्लिष्ट तरतुदी आहेत त्या गोष्टीला विरोध आहे. सर्वांना वस्तुंच्या गुणवत्तेबद्दल विरोध नाही पण त्या राबवण्याच्या प्रणालीस विरोध आहे.

त्यात योग्य तो बदल करून सर्वांना त्याची अंमलबजावणी साधी सोपी कशी होईल याचा संबंधित विभागाने विचार करावा हे लक्षात आणुन देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी बंधु हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार आहेत, असे जिल्हा अध्यक्ष मनोज श्रॉफ, उपाध्यक्ष जगदीश सोनी व पदाधिकार्‍यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या