Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरनातवानेच चोरले आजीचे सव्वा दोन लाखांचे दागिणे

नातवानेच चोरले आजीचे सव्वा दोन लाखांचे दागिणे

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

दोन मित्रांच्या मदतीने नातवानेच आजीच्या पेटीमधील दोन लाख 32 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले.

- Advertisement -

कल्याण रोडवरील शिवाजीनगरमध्ये असलेल्या भावनाऋषी सोसायटीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आजी पुष्पा सुरेश देशमुख (रा. शिवाजीनगर, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नातू शिरीष संजय देशमुख, भोल्या, कमलेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष हा फिर्यादी पुष्पा देशमुख यांचा नातू असून तो त्यांच्याच घरामध्ये राहतो. शिरीष व त्याचे दोन मित्र भोल्या व कमलेश यांनी मिळून फिर्यादी यांच्या पेटीमधील दोन लाख 32 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांना शिरीष याचा संशय आल्याने फिर्यादी यांनी त्याच्याकडे चौकशी केली.

परंतू, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गाजरे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या