Thursday, April 25, 2024
Homeधुळेसामोडेत सशस्त्र दरोडा; तीन लाख रोकडसह 50 तोळे सोने लुटले

सामोडेत सशस्त्र दरोडा; तीन लाख रोकडसह 50 तोळे सोने लुटले

पिंपळनेर – प्रतिनिधी Dhule

साक्री तालुक्यातील सामोडे येथे शरद शिंदे यांच्या बंगल्यावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी टाकला दरोडा टाकत तीन लाख रुपये रोख व 50 तोळे सोने पिस्तुलचा धाक दाखवून लुटून नेले. विरोध करताना दरोडेखोरांनी पिस्तुलातून एक गोळी कॉटवर झाडून दहशत निर्माण केली.

- Advertisement -

आज दि.13 जानेवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सामोडे विठ्ठल मंदिर नगर जवळ असलेल्या जयदया आय .टी.आय. जवळील शरद दयाराम शिंदे यांच्या जयदया बंगला असून पाच दरोडेखोर तीक्ष्ण हत्यारे व पिस्तूल घेऊन दाखल झाले व दरवाजा ठोठावला.

दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.यावेळी शरद शिंदे, सौ.शिंदे व त्याचा चिरंजीव घरात झोपले असताना त्यांना हत्यार व पिस्तुलाचा धाक दाखवला बंगल्यातील तीन कपाटी व व कॉट तोडून त्यातील रोख रक्कम तीन लाख रुपये व 50 तोळे सोने असा सुमारे 30 ते 32 लाखाचा मुद्यमाल लुटून नेला. यावेळी चिरंजीव शिंदे यांनी विरोध करताना दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून एक गोळी कॉटवर झाडली व पिस्तुलाचा धाक दाखवत सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन दरोडेखोरांनी या तीनही ही परिवारातील सदस्यांना आत कोंडून त्यांच्याजवळील मोबाईल हीसकाऊन घेतले. मात्र जाताना हे मोबाईल अंगणात सोडून गेले. त्याची कार मात्र पंचर करून गेले.

मात्र घरातील तीघांना मारहाण केली नाही.केवळ शस्रांचा धाक दाखवून ऐवज लुटून नेला. घटनेची माहिती मिळताच त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षण शिवाजी बुधवंत फौजफाट्यासह दाखल झाले. श्वान वीरूने बंगल्यापासून शंभर मीटर अंतरावर सामोडे- दहिवेल तीन रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. मात्र दरोडेखोर गाडीने प्रसार झाल्यामुळे पुढील तपास मिळाला नाही.

घटनास्थळी फिंगर प्रिंट पथकाने विविध ठसे घेतले असून एलसीबी पुढील तपास करत आहे. सामोडे गावात सशस्त्र दरोडा पडल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दरोडेखोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या