Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदोन महिन्यांत सोने 5500 रुपयांनी स्वस्त

दोन महिन्यांत सोने 5500 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली –

सण-उत्सवाचा हंगाम सुरु झाला असला तरी मागणी नसल्याने सोन्या- चांदीच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा

- Advertisement -

50 हजार 653 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. तर चांदी देखील 61 हजार 512 प्रतिकिलो पातळीवर बंद झाली. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसले. सोन्याचे आताचे दर प्रतितोळा 5500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत प्रतिकिलो 16000 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

7 ऑगस्ट 2020 ला सोन्या- चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने- चांदीने त्यांचा उच्चांक गाठला होता. सोन्याने प्रति तोळा 56 हजार 200 रुपयांची उच्चांकी गाठली होती. तर चांदी प्रतिकिलो 77 हजार 840 रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आतापर्यंत 5547 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी प्रतिकिलो 15844 रुपयांनी खाली आली आहे.

तर दुसरीकडे बाजारातील मागणीही कमी झाल्याने व्यापार्‍यांनी व्यवहार कमी केले आहेत. त्यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांची घट झाली. सोने 50 हजार 665 प्रतितोळा राहिले. मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरचा सोन्याचा वायदा भाव 47 रुपयांनी घटला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या