Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशसोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात घसरण

नवी दिल्ली –

शेअर बाजारात मंदी असली तरी सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याचा दरात

- Advertisement -

घसरण झाली होती. काल गुरुवारी सोन्याच्या दरात 485 रुपयांची घसरण झाली. यामुळे सोन्याचा प्रतितोळा (प्रति 10 ग्रँम) दर 50,418 रुपयांपर्यंत खाली आला. बुधवारी सोन्याचा दर 50,903 रुपये होता. त्यात रोज घसरण होत आहे.

तर वायदे बाजारात गुरुवारी सोने 0.16 टक्क्यांनी घसरुन प्रतितोळा 49,428 रुपये झाले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर डिलिवरी सोन्याचा दर 80 रुपयांनी घसरून 49,428 वर स्थिर झाला होता. पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

करोना संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी, रुपयाच्या तुलनेत कमजोर झालेला डॉलर आणि मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या