Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशसोने तब्बल दहा हजारांनी स्वस्त? गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे का?

सोने तब्बल दहा हजारांनी स्वस्त? गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे का?

नवी दिल्ली

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Price Today) सध्या चांगले दिवस आहे. सोन्याचे दर गेल्या निचांकी पातळीवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल १० हजारांनी घसरण झाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर ४६ हजार २७० रुपये प्रति तोळे झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हा दर ५६ हजार २०० रुपये होता.

- Advertisement -

एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास १.३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. या दरम्यान चांदीचे दरही (Silver Price Today) १.५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

दहावीसंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय, अकरावीच्या सीईटीसंदर्भात दिले हे आदेश

आज बुधवारी सोन्याचे दर (Gold price) कमी झाले आहेत. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या ३ दिवसात चांदीचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी तर सोन्याचे दर १ हजार २०० रुपयांनी खाली आले आहेत. आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय ६३ हजार रुपये प्रति किलो आहेत.

दर का कमी होत आहे?

आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. सोन्याचे दर अजून 1 हजार रुपयांनी घसरू शकतात. चांदीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांनी आता 30 टक्के इतकी खरेदी करायला हरकत नाही, असे सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या