बसमधून उतरताच महिलेचे सव्वातीन तोळे लंपास

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सावेडी बस स्टॉपवर बसमधून उतरलेल्या दोन महिलांनी बसमधून प्रवास करणार्‍या महिलेचे सव्वातीन तोळे दागिने, तीन हजार रूपये रोख रक्कम असलेली पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी महिलेचा मुलगा अजू विठ्ठल दातीर (मुळ रा. डिग्रस, ता. राहुरी, हल्ली रा. कारागृह वसाहत, नगर रोड, जि. बीड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी दातीर यांची आई राहुरीहून नाशिक ते पारनेर बसने नगरला येत होत्या. त्या दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सावेडी बस स्टॉपवर उतरलेल्या. त्यावेळी दोन महिलांनी सव्वातीन तोळे दागिने, तीन हजार रूपये रोख रक्कम असलेली त्यांची पिशवी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *