Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशआजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

नवी दिल्ली

आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात आली. बीआयएसनुसार (BIS), अनिवार्य हॉलमार्किंगमुळे सामान्य लोकांना फायदा होईल. यामुळे ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करताना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. तसेच त्यांना दागिन्यांवर लिहिलेल्या शुद्धतेनुसारच दागिने मिळतील.

- Advertisement -

अखेरी त्या १२ आमदारांची यादी सापडली, आरटीआयमधून मिळाली ‘ ही ’ माहिती

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो. आजपासून सर्व ज्वैलर्सना केवळ १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेटचे सोनेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून गोल्ड हॉलमार्किंगची स्किम चालवत आहे. सध्या केवळ ४० टक्के ज्वैलरीचेच हॉलमार्किंग झालेली आहे. ज्वैलर्सच्या सोयीसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑटोमॅटिक करण्यात आली आहे. हेत.

हॉलमार्किंग म्हणजे काय?

गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे एक प्रमाणपत्र आहे. सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते. आता सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोने शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

घरातील सोन्याचे काय होईल?

गोल्ड हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्याने, आता घरात असलेल्या सोन्याचे काय होणार, त्याची विक्री कशी होणार, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहेत. मात्र, गोल्ड हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा घरात असलेल्या सोन्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसेच जुन्या दागिन्यांची विक्री करतानाही याचा काही परिणाम होणार नाही. आपण पूर्वीप्रमाणेच आपले सोने ज्वेलर्सकडे विकू शकता. हा नियम केवळ ज्वेलर्ससाठीच आहे. त्यांना हॉलमार्क शिवाय सोने विकता येणार नाही.

हॉलमार्किंगसाठी खर्च किती येणार

ज्वैलर हॉलमार्किंगसाठी ३५ रुपए (कर वेगळा) खर्च येईल. परंतु दागिण्यांच्या शुद्धतेची तपासणीसाठी २०० (कर वेगळा) लागतील. BIS च्या प्रयोगशाळेतून केवळ ज्वेलर्सला ही हॉलमार्किंग करुन मिळेल. यासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागेल.

हॉलमार्किंग नसेल तर काय होणार कारवाई

कुठलाही ज्वैलर हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात एक वर्षाच्या शिक्षेशिवाय, त्याच्याकडून गोल्ड ज्वैलरीच्या रकमेच्या पाच टक्के दंडही वसून केला जाऊ शकतो. प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्क नंबर टाकले जातात. ज्वैलर्सकडून 22 कॅरेटसाठी 916 नंबरचा वापर केला जातो. 18 कॅरेटसाठी 750 नंबरचा वापर केला जातो आणि 14 कॅरेटसाठी 585 नंबरचा वापर केला जातो. यावरून आपल्याला सहजपणे समजेल, की घेतलेले सोने किती कॅरेटचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या