Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसोनसाखळी चोर जेरबंद

सोनसाखळी चोर जेरबंद

नवीन नाशिक |प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या ( Ambad Police Station )गुन्हेशोध पथकाने सापळा रचत एका सोनसाखळी चोरट्यास (chain Snatcher )अटक करून त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार दुचाकी असा ६ लाख ३५ हजार ७५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा तेजस्विनी रोहित झगडे ( १९,रा. अनुष्का रो हाऊस शिवपुरी चौक ) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून अनोळखी भामट्याने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तपास करत असतांना गुन्हेशाखेचे सपोनी गणेश शिंदे व पोलीस शिपाई संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख पोलीस निरीक्षक नंदन बगाडे ,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी,गणेश शिंदे अंमलदार किरण गायकवाड, अनिरुद्ध येवले ,संदीप भुरे ,हेमंत आहेर ,जनार्दन ढाकणे ,राकेश राऊत, योगेश शिरसाठ ,मुकेश गांगुर्डे ,प्रशांत नागरे,तुळशीराम जाधव,नितीन सानप यांच्या पथकाने सापळा रचत संशयित प्रकाश उर्फ राकेश उर्फ तिरी भारत कुमावत ( ३१,रा. बालाजी मंदिरामागे ,सावतानगर नवीन नाशिक ) याला शिताफीने अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतले असता अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त चौक,खुटवड नगर,ओम कॉलनी बुरकुले हॉल मागे,वृंदावन नगर तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास बॅंकेसमोर सोनसाखळी ओरबाडल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ११६ ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड असा ५ लाख ५५ हजार ७५६ रुपयांच्या मुद्देमालासह ४ गुन्ह्यात वापरलेल्या चार ८० हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकल असा ६ लाख ३५ हजार ७५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कुमावत यास न्यालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास तिन दिवस पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास सपोनी निलेश राजपूत व पोलीस शिपाई सुचित सोळुंखे करत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या