Friday, April 26, 2024
HomeजळगावPhotos #पलोड शाळेमध्ये अवतरली गोकूळ नगरी

Photos #पलोड शाळेमध्ये अवतरली गोकूळ नगरी

जळगाव jalgaon

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (Kashinath Palod Public School) मध्ये कृष्णजन्माष्टमी (Krishna Janmashtami excitement) उत्साहात साजरी करण्यात आली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वयिका सौ. संगीता तळेले,सौ.स्वाती अहिरराव,सौ. अनघा सागडे यांच्या हस्ते पाळण्यातील बालकृष्णाचे पूजन करण्यात आले. पूर्णेश पाटील, हर्षिता बारी व एकता मुंदरा यांनी कृष्णजन्माष्टमी ची माहिती व महत्व सांगितले. त्यानंतर सिनियर केजी.च्या विद्यार्थिनीने सुंदर नृत्य सादर केले.

कृष्ण जन्माचा प्रसंग इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केला. इयत्ता चौथी , पाचवी, आठवी विद्यार्थिनींनी राधा कृष्णाच्या गाण्यांवर तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला रे आला या गीतावर नृत्य सादर केले. याशिवाय इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी स्वरा पाटील व गौरी पिंपळे यांनीही बहरदार नृत्य सादर केले.

दिव्यांशी पात्र सौ. मेनू छाजेड व सौ. कल्पना सोनवणे यांनी गीत सादर केले शाळेचे विदयार्थी राधा ,कृष्णा च्या वेशभूषेत आले होते.

समन्वयिका सौ. स्वाती अहिरराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाटील या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रमाच्या शेवटी “हाथी घोडा पालकी जय कैन्हया लाल की” च्या जयघोषात बाल गोपलांनी दही हंडी फोडली व गोपाल काल्याच्या प्रसादाचे विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.

सौ कल्पना सोनवणे,सौ. सरोज जयस्वाल , पुनम पाटील, सौ वृंदा बारकरे,श्री अमर जंगले हे या कार्यक्रमाचे प्रमुख होते. या कार्यक्रमासाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे वाहन विभागप्रमुख श्री. मिलिंद पुराणिक, शाळेच्या समन्वयिका संगीता तळले, . स्वाती अहिरराव, . अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले व संजय भोंडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या