Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

शोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

नाशिक | प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणाऱ्या व आपल्या कार्यातून सर्व समाजासमोर आदर्श असणाऱ्या सर डॉ. मो. स. गोसावी यांना गोखले एज्युकेशन सोसायटी तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

- Advertisement -

संस्थेच्या ’गुरुदक्षिणा’ सभागृहात श्रद्धांजली सभेत संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पंडित , संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, पालक मंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, विभागीय सचिव प्राचार्य राम कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा प्राचार्या डॉ. सुहासिनी संत, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी विश्वस्त डॉ. आर. पी. देशपांडे, देणगीदार अतुल चांडक, जयंतराव कुलकर्णी, सुहास क्षत्रिय, विक्रम कपाडिया उपस्थित होते. संस्थेचे आस्थापना संचालक शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी , प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे, व गोसावी व देशपांडे परिवाराचे सदस्य, समाजातील मान्यवर, संस्थेचे सर्व अध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मोदी सरकारला झटका! ‘तो’ निर्णय सुप्रीम कोर्टाने ठरवला बेकायदेशीर

आमदार फरांदे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या सरांनी ह्या संस्थेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिक्षण संस्थेचे संचालक कसे असावे ह्याचा वस्तुपाठ घालून दिला.तर हिरे यांनी नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व तीन ही क्षेत्रातील सरांचे मोठेपण व्यक्त केले.

केंद्रीय समन्वय समितीचे शाळा विभागचे समन्वयक विनोद देशपांडे, बी. वाय. के. महाविद्यालयाचे प्राचार्य व ब्रँच सेक्रेटरी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी आठवणी सांगताना शिक्षकांमध्ये संशोधन वृती रुजवण्यासाठी प्रोत्साहन ते देत होते व विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची संधी मिळावी ह्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.

“माझा कलंक शब्द इतका…”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आपल्या भावना व्यक्त केल्या. पालघर महाविद्यालयाचे प्राचार्य व शाखा अधिकारी मेश्राम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने बी. वाय. के. महविद्यालयाचे रजिस्ट्रार गिरीश नातू, संस्थेच्या देणगीदारांच्या वतीने अतुल चांडक, माजी प्राचार्यांच्या वतीने प्राचार्य के. आर. शिंपी, अ‍ॅड. जयंत जायभावे, लक्ष्मीकांत जोशी, प्रा. दिलीप फडके, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संस्थेच्या उपाध्यक्षा प्राचार्या डॉ. सुहासिनी संत, विश्वस्त प्राचार्य डॉ.आर पी देशपांडे, एच. एस .सी .व एस. एस. सी. बोर्डाचे, मच्छिंद्र कदम, प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी, ते म्हणाले सरांची नाळ ही शिक्षणाशी जुळली होती. १९५८ साली त्यांनी घेतलेली प्राचार्यपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. संस्थापक प्रिं. टी. ए कुलकर्णी ह्यांनी लावलेल्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर गोसावी सरांनी केले. सरांची उर्वरित कामे संपूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे.

Nashik Accident News : ओमनी-अर्टिगाचा भीषण अपघात; तीन वर्षाच्या बालकासह एकाचा मृत्यू

एस. बी. पंडित ह्यांच्या श्रद्धांजलीने ह्या सभेचा समारोप झाला. त्यांनी सरांबरोबर ६५ वर्षे एक मताने काम करताना आलेले अनुभव स्पष्ट केले. त्यांनी गोसावी सरांच्या बरोबर संस्थेच्या विविध प्रकल्पांची उभारणी कशी केली त्या बद्दल आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक डॉ. राम कुलकर्णी यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या