Wednesday, April 24, 2024
HomeजळगावAccident # महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणे पडले महागात

Accident # महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणे पडले महागात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) विरुद्ध दिशेने जाणार्‍या दुचाकीस्वारांना (bikers)भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या ऑईलच्या टँकरने (oil tanker) चिरडल्याची (Crushed) रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नशिराबाद जवळ घडली. या अपघातात संदिप मलेसिंग शिरसाम (वय-30) व त्याचा मित्र बसंत मुन्ना वरखेडे (वय-28, दोघ रा. मूळ रा. बैसदेही, ता. धामनिया, जि. बैतुल मध्यप्रदेश, ह. मु. पंढरपुरनगर) या दोघ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. नशिराबाद पोलिसांनी दोघ तरुणांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मूळचे मध्यप्रदेशातील बैतुल येथील संदीप शिरसाम व बसंत वरखेडे हे दोघ तरुण गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या मूळ गावी गेले होते. परंतु एमआयडीसी परिसरात नवीन चटईची कंपनी सुरु झाल्याने संदीप व बसंत हे दोघ चार दिवसांपुर्वी जळगावात आले होते. एमआयडीसी परिसरात असलेल्या पंढरपुर नगरात ते वास्तव्य करीत होते. ते दोघ सोबतच तरुण चटईच्या कंपनीत रात्रपाळीला काम करीत असल्याने शनिवारी कंपनी बंदच होती. त्यामुळे आज रात्रपाळीला ते कंपनीत कामाला जाणार होते. परंतु रविवारी दुपारच्या सुमारास दोघे जण त्यांच्याकडे असलेल्या (एम.पी.48.एम.आर.5397) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडे जाण्यासाठी निघालेे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन, रुपेश साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील मयत तरुणाचे मृतदेह रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले.ं

टँकरच्या चाकाखाली आल्याने दोघ जागीच ठार

दुचाकीस्वार दोघे तरुण जळगाव-भुसावळ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने नशिराबाद पुलाच्याकडे निघाले होते. याच वेळेस भुसावळ कडून जळगावच्या दिशने भरधाव वेगाने पुलावरुन खाली उतरणार्‍या(एमएच.04.डीएस.2217) क्रमांकाच्या ऑईलच्या टँकरने दोघ तरुणांना चिरडले. दुचाकीस्वार तरुण थेट टँकरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चालकाचा दोघांना वाचविण्याचा प्रयत्न ठरला असफल

महामार्गावर विरुद्ध दिनेशे येणार्‍या दुचाकीस्वारांना सुसाट असलेल्या टँकर चालकाने वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघ दुचाकीस्वार थेट टँकरच्या समोरच्या टायरखाली आल्याने चालकाचा हा प्रयत्न असफल ठरला आणि दोघ दुचाकीस्वांराचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दोघ तरुण एकाच गावातील रहिवासी

संदीप व बसंत हे दोघ तरुण मध्यप्रदेशातील बैसदेही गावात शेजारी राहत असून ते एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. संदीपचा मोठा भाऊ हा देखील चटई कंपनीत कामाला कामाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी, दोन मोठे भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा तर बसंत याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षांची मुलगी, दोन भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. दोघ मयत तरुणांचे मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या