Thursday, April 25, 2024
Homeनगरगोगलगाव विकास सोसायटीत जनसेवेचा दणदणीत विजय

गोगलगाव विकास सोसायटीत जनसेवेचा दणदणीत विजय

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील गोगलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आ. विखे समर्थक जनसेवा मंडळाने विरोधी परिवर्तन मंडळाचा धुव्वा उडवीत सर्व बारा जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.

- Advertisement -

जनसेवाचे नानासाहेब गायकर (303), बाळासाहेब गुळवे (248), माणिक गोर्डे (277), चंद्रभान चौधरी (295), मारुती ठोके (243), निवृत्ती पांढरकर (267), तान्हाजी मगर (283), ज्ञानदेव मगर (281), मुरलीधर दुशिंग (295), राहीबाई पडवळ (342), गंगुबाई मगर (316), बबन खाडे (331) मते मिळवून सर्व बारा उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले. जनसेवा मंडळाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सोसायटीचे चेअरमन नामदेव पांढरकर, व्हा.चेअरमन रावसाहेब मगर, रामप्रसाद मगर, त्रिंबक गायकर, साहेबराव पडवळ, राधाकृष्ण गायकर, बाळासाहेब ठोके, बाळासाहेब गोर्डे, प्रभाकर मगर, अण्णासाहेब मगर, जाणिकनाथ पांढरकर, संपत तनपुरे, बबन सोसे, सारंगधर दुशिंग, सरपंच भाऊसाहेब खाडे, मच्छिंद्र गायकर, संतोष माघाडे, उपसरपंच अनिल चौधरी, मच्छीन्द्र मगर, पांडुरंग चौधरी,नामदेव मगर,संतराम चौधरी, बबन पडवळ, काशिनाथ गुळवे, चांगदेव मगर आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या