Thursday, April 25, 2024
Homeनगरगोधेगाव ते देवगड प्रवासासाठी 14 लाखांची बोट

गोधेगाव ते देवगड प्रवासासाठी 14 लाखांची बोट

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

श्रीक्षेत्र देवगडपासून हाकेच्या अंतरावर असलेले सद्गुरु किसनगिरी बाबा यांचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र गोधेगाव येथे भाविकांना तसेच नागरिकांना जाण्यासाठी गोदावरीतील पाण्यामुळे दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे प्रशांत गडाख व ना. गडाख यांनी गोधेगाव ते देवगड प्रवासासाठी बोट उपलब्ध करुन देण्याच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची नुकतीच पुर्तता केली.

- Advertisement -

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभापती सुनील गडाख यांनी जिल्हा परिषद सेस निधीतून 14 लाख रुपये किंमतीची बोट उपलब्ध करुन दिली. 2 मे रोजी गोधेगाव जन्मभूमी मंदिर येथे ही बोट देण्यात आली. याप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, सरपंच संदीप सुडके, राजेंद्र गोलांडे, उपसरपंच गोपीचंद पल्हारे, दिलीप शेलार, भगवान काळे, संजय घुले, महेश शेळके, शांतीलाल पल्हारे, दत्तात्रय पिंपळे, राणू माळी, संजय पल्हारे, पप्पू शेख, मिनिनाथ जाधव, विजय घोलप, गणेश घाडगे, संतोष मोरे, बाप्पू शेलार, संतोष गोलांडे, नवनाथ घाडगे, शुभम पठाडे, नवनाथ गाडेकर महेश शेलार, गणेश नरोडे आदी उपस्थित होते. यावेळी या बोटीतून एका वेळेस 18 ते 20 प्रवासी ये-जा करणार आहेत.

बोटीमुळे प्रामुख्याने गोधेगाव येथील शालेय विद्यार्थी, शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक, रोजंदारीवरील कामगार, आजारी व्यक्ती, भाविक यांचा दळवळणाचा प्रश्न मिटणार आहे. देवगड, मुरमे, मडकी, खलालपिंप्री, बकुपिंपळगाव, भालगाव या परिसरातील नागरिकांनाही बोटीचा फायदा होणार आहे. ना शंकरराव गडाख,प्रशांत गडाख, सुनील गडाख यांचे गोधेगाव व परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

गोधेगाव ते देवगड गोदावरी नदीपत्रातून प्रवासासाठी बोट मिळावी अशी आमची मागणी होती. ना. शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या निधीतून गोधेगाव ग्रामस्थांसाठी बोट उपलब्ध करून देऊन शालेय विद्यार्थी, नागरिक,भाविक यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला व वचनपूर्ती केली.

-सीताराम जाधव ज्येष्ठ नागरिक गोधेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या