Tuesday, April 23, 2024
Homeनगरवासरे जगवण्यासाठी गोधेगावच्या गोशाळा चालकांची धडपड

वासरे जगवण्यासाठी गोधेगावच्या गोशाळा चालकांची धडपड

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – कत्तलखान्याकडे जाणार्‍या पोलिसांनी पकडलेल्या गोवंश जनावरे गोशाळेकडे सुपूर्द केली जातात. गोधेगाव येथील गोशाळेकडे 5 कमी वयाची वासरे सोपविली आहेत. ही वासरे जगवण्यासाठी गोशाळा चालकांची मोठी धडपड सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील कानिफनाथ बहुद्देशिय संस्थेची नेवासाफाटा येथे गोशाळा आहे.

- Advertisement -

दुग्धोत्पादनातून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचविणार्‍या परंतु तेच दुग्ध उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणार्‍या गोमातांना (भाकड गाई) तसेच लहान वासरांना कत्तलखान्याचा रस्ता दाखविला जातो.

गोधेगाव येथील कानिफनाथ बहुद्देशिय संस्था संचालित तेजस्विनी गो-शाळेत नुकत्याच जन्मलेल्या जर्सी गायींची साधारण 15 दिवस वय असलेली आठ वासरे नेवासा पोलिसांनी गो-शाळेत पाठविली. मात्र त्यांच्या आईंचा तपास नसल्याने ‘त्या’ वासरांचे दूध बंद झालेले आहे. त्या वासरांना वाचविण्यासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे संतोष पंढूरे व तेजस्विनी गो-शाळेचे अध्यक्ष अनिल पठाडे यांचे परिश्रम सुरु आहेत.

कुठल्याही प्रकारची मदत नसताना गो-शाळेत 50 गो-मातांचा संभाळ करत आहोत. शेणापासून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. या खताची विक्री करुन ही गो-शाळा चालविण्यात येत आहे. गो-शाळेसाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी मदत करावी.

– अनिल पठाडे, गो-शाळा चालक

दुसर्‍या गायींचे दुध काढून वासरांना पाजत त्यांच्या संगोपणासाठी गो-शाळेचा लढा सुरु आहे. मात्र 8 वासरांपैकी 3 वासरांचा मृत्यू झालेला आहे तर आता 5 वासरे जगविण्यासाठी दररोज त्यांना 6 लिटर दुध व औषध सुरु आहे. या वासरांचे पदरमोड करुन आम्ही संगोपन करत आहोत. जी जनावरे येथे आणून सोडलेली आहेत त्या जनावरांच्या औषध व चार्‍यासाठी आम्ही लवकरच न्यायालयात पोटगीचा दावा दाखल करणार आहोत.

– संतोष पंढूरे कार्यकर्ते, विश्‍वहिंदू परिषद

- Advertisment -

ताज्या बातम्या