गोदावरी पाण्याच्या आवर्तनाचे अधिकार्‍यांनी सुयोग्य नियोजन करावे

jalgaon-digital
3 Min Read

राहाता |प्रतिनिधी| Rahata

गोदावरी (Godavari) लाभक्षेत्राला पाण्याच्या आवर्तनाचे (Water Avartan) अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून सुयोग्य नियोजन (Planning) करावे, आवर्तनाच्या काळामध्ये असलेल्या आदेशाप्रमाणे भारनियमाच्या वेळापत्रकाचेही पालन व्हावे, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही याची आधिकारी, कर्मचार्‍यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनीही दक्षता घेण्याबरोबरच निळवंडे धरणातूनही (Nilwande Dam) पाणी सोडण्याबाबतचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.

अकोले, राहुरी, नगर आणि कर्जतमध्ये दूध प्रकल्पांची तपासणी

गोदावरी (Godavari) आणि प्रवरा धरण (Pravara Dam) समुहातील आवर्तनाच्या नियोजनाचा आढावा मंत्री विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी नगर (Ahmednagar), नाशिक (Nashik) येथील जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department ) अधिकार्‍यांकडून घेतला. याप्रसंगी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधिक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलीस आधिकारी गोकावे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बडगुजर, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता हाफसे उपस्थित होते.

ना. विखे पाटील यांनी गोदावरी आणि प्रवरा धरण समुहातील पाण्याचा आढावा घेवून आवर्तनाच्या नियोजनाची वस्तुस्थिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा प्रथमच ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातच आपल्याला धरणातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच आपल्याला आवर्तनाचे नियोजन सुयोग्य पध्दतीने करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोतूळमध्ये एकाच व्यासपीठावर दोन ग्रामसभा

पिकांना पाणी मिळणे अत्यंत गरजेचेच आहे. यासाठी धरण समुहातील शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे नियोजन आवश्यक आहे. यासाठी चार्‍यांमधील अडथळे व्यवस्थितपणे दुर करावेत. आवश्यक ठिकाणी जेसीबीसह अन्य साहित्य व मनुष्यबळाची मदत डॉ. विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) अधिकार्‍यांनाही भारनियमनाबाबतचे नियोजन चांगल्या पध्दतीने हाताळावे, शेतकर्‍यांना कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. बेकायदेशिरपणे पाणी उपसले जाणार नाही याकरीता पोलीस प्रशासनाची मदत घेण्याबाबतही त्यांनी बैठकीत सुचित केले.

निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सोडण्यात येणार्‍या पाण्याचाही आढावा त्यांनी घेतला. कालव्यातून तातडीने पाणी देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र अकोले तालुक्यात (Akole) असलेल्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सुरु असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ही कामे 10 दिवसात पूर्ण करुन पाणी देण्याबाबतच्या सूचना त्यांनी निळवंडे प्रकल्पाच्या (Nilwande Project) अधिकार्‍यांना दिल्या.

हनीट्रॅप : केडगावचा अविवाहीत युवक महिलेच्या जाळ्यात

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *