Thursday, April 25, 2024
Homeनगरगोदावरीतील विसर्ग बंद !

गोदावरीतील विसर्ग बंद !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याची आवकही (Inflow of water) कमी झाली असल्याने धरणांचे विसर्ग घटल्याने नांदूरमधेश्वर (Nandurmadheshwar) बंधार्‍यातून गोदावरीत (Godavari) सोडण्यात येणारा विसर्ग (Visarg) काल दुपारनंतर 4 वाजता बंद करण्यात आला आहे. तो कदाचित उद्या पुन्हा अल्प प्रमाणात सुरू होऊ शकतो. या बंधार्‍यातून जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत 3.5 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणातून (Darna) 1294 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

- Advertisement -

वरील धरणांचे विसर्ग घटले त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक कमी झाल्याने काल सकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग काल दुपारनंतर 4 वाजता बंद करण्यात आला आहे. गोदावरीचे दोन्ही कालवे दोन दिवसांपुर्वीच बंद करण्यात आले आहेत. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात 92 टक्के पाणीसाठा आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गोदावरीतील विसर्ग बंद करण्यात आला आहे. आज मंगळवारी हा बंधारा 100 टक्के होऊन त्यातून गोदावरीत 50 ते 100 क्युसेक ने पाणी पुन्हा सोडले जाण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप थांबल्याने विसर्ग कमी करण्यात आले आहे.

पावसाचा जोर ओसरल्याने गंगापूरचा विसर्ग चार दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला. दारणातून मात्र विसर्ग सुरु आहे. दारणात भावलीतून सांडव्यावरून पडणारा विसर्ग सुरू आहे. भावलीतून 135 क्युसेकने विसर्ग दाखल होत आहे. त्यामुळे दारणात काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 133 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणा 75.23 टक्क्यांवर स्थिर आहे. गंगापूर 76.18 टक्क्यांवर स्थिर आहे.

मुकणे निम्मे भरले!

भावली, वालदेवी हे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. दारणा, गंगापूर 75 टक्क्यांच्यापुढे आहेत. कडवा 68 टक्के, भाम 83 टक्के, आळंदी 76 टक्के, असून मुकणे काल सकाळी 6 वाजता 51 टक्के भरले आहे. गंगापूर समुहातील गौतमी गोदावरी 58.40 टक्के तर कश्यपी 48.97 टक्के भरले आहे. वाकी 40.45 टक्के असे भरले आहे. पाणलोटा बरोबरच गोदावरीच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातूनही पाऊस गायब झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या