Friday, April 26, 2024
Homeनगरगोदावरी दूध संघाकडून 16 कोटी 63 लाख रुपये बँकेत वर्ग - परजणे

गोदावरी दूध संघाकडून 16 कोटी 63 लाख रुपये बँकेत वर्ग – परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने दीपावली सणानिमित्त

- Advertisement -

दूध उत्पादकांचे पेमेंट, परतीच्या ठेवी, वाहतूकदारांचे पेमेंट आणि कर्मचार्‍यांसाठीचा बोनस व पगार असे सुमारे 16 कोटी 63 लाख रुपये 5 नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.

गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना दि. 11 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीचे पेमेंट 10 कोटी 83 लाख रुपये, परतीच्या ठेवीची रक्कम साधारणपणे 4 कोटी रुपये, संघाच्या कर्मचार्‍यांना पगार व बोनसपोटी 1 कोटी रुपये, अंतर्गत व बहिर्गत दूध वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांचे तसेच संघाला मालपुरवठा करणार्‍या पुरवठाधारकांचे पेमेंट साधारणपणे 1 कोटी अशी एकूण 16 कोटी 63 लाख रुपये रक्कम 5 नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग केली जाणार आहे.

करोना महामारीच्या कालावधीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असतानाही दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार, संघाला मालाचा पुरवठा करणारे विक्रेते यांनी संघाशी एकनिष्ठ राहून संघाप्रती विश्वास दाखविला. या सर्वांच्या सहकार्यामुळेच संघाने आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून मोठा आर्थिक हातभार लावला.

कार्यक्षेत्रातील दूध उत्पादन वाढण्याच्यादृष्टीने सॉर्टेड सिमेनचा कार्यक्रम राबविण्यात आला. संघाच्या कार्यक्षेत्रात एकूण 35 कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून त्यामार्फत सॉर्टेड सिमेन रेतनाचे काम चालते. नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींची परिस्थिती विचारात घेऊन संघ व बायफ संस्थेने 1 नोव्हेंबरपासून सॉर्टेड सिमेनचा दर 900 रुपयांवरून 600 रुपये केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या