गोदावरी दुथडी ! 33493 क्युसेकने विसर्ग

jalgaon-digital
4 Min Read

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहिल्याने धरणांमध्ये (Dam) नवीन पाण्याची आवक वाढल्याने काही धरणांच्या विसर्गात वाढ झाली. दारणा (Darna) 12788 क्युसेक, गंगापूर (Gangapur) 4009 क्युसेक, कडवा 8480 क्युसेक, वालदेवी (valdevi) 599 क्युसेक, पालखेड (Palkhed) मधून 432 व नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातून नवीन पाणी दाखल होत असल्याने काल सायंकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून गोदावरीत (Godavari) जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने 33493 क्युसेकने विसर्ग सुरु होता. यामुळे गोदावरीत दुथडी (Duthadi in Godavari) भरुन वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान खाली जायकवाडीत उपयुक्तसाठा (Jayakwadi Water Storage) 62 टक्क्यांवर पोहचला होता. या जलाशयात 25 हजार 185 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. मुळा प्रवराचा (Mula, Pravara) विसर्ग रात्रीतून जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये (Backwaters of Jayakwadi) सामावलेला असेल. पाण्याची आवक पाहता जायकवाडी जलाशयाचा उपयुक्तसाठा आज बुधवारी सायंकाळ पर्यंत 65 टक्क्यांवर पोहचलेला असेल असा अंदाज आहे.

दारणा (Darna), भावली (Bhavali) तसेच गंगापूरच्या पाणलोटात (watershed of Gangapur) काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत धुव्वाधार पाऊस झाला. भावलीला 24 तासांत तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या (Darna) पाणलोटातील इगतपुरीला 153 मिमी, तर अंबोलीला 142 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या (Gangapur) भिंतीजवळ 66 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा 28, भाम 83, वाकी 60 मिमी, कश्यपीला 42 तर गौतमीला 41 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर राहिल्याने दारणात (Darna) काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत पाऊण टीएमसी पाणी दाखल झाले. गंगापूर मध्ये 259 दलघफू, कडवात 167 दलघफू, भाममध्ये (Bham) 317 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणातुन 12788 क्युसेकने सुरु आहे. गंगापूरचा विसर्ग काल सकाळी 6 वाजता 4009 क्युसेक इतका होता. काल दिवसभरात पावसाने जवळपास उघडीप दिल्याने नवीन येणारे पाणी मंदावल्याने हा विसर्ग 2212 क्युसेक वर स्थिर ठेवण्यात आला. कडवा चा विसर्ग सकाळी 6 ला 1272 क्युसेक इतका होता. तो दुपारी 12 वाजता 8480 क्युसेक वर नेण्यात आला. पुन्हा तो सायंकाळी 6 वाजता 2120 क्युसेकवर आणण्यात आला. वालदेवीतील विसर्ग 183 वरुन काल दुपारी 2 वाजता 599 क्युसेक इतका करण्यात आला होता.

वरील धरणातील विसर्ग खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहेत. या शिवाय नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातील पाण्याची आवक वाढत असल्याने या बंधार्‍यातुन काल पहाटे सुरु असलेला 23 हजार 905 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग सकाळी 6 वाजता 20823 क्युसेक वर आणण्यात आला. पुन्हा धरणातील विसर्ग वाढु लागल्याने दुपारी 3 वाजता 26246 क्युसेक इतका वाढविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता गोदावरीतील विसर्ग 33 हजार 493 क्युसेकवर नेण्यात आल्याने गोदापात्रातील पाणी वाढल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. 1 जून पासुन काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यात जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 9.8 टिएमसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आला आहे.

जायकवाडी उपयुक्तसाठा 62 टक्क्यांवर!

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता गोदावरीतुन झेपावणारा 25185 क्युसेक इतका विसर्ग दाखल होत होता.काल सायंकाळी 6 वाजता या जलाशयातील उपयुक्तसाठा 62 टक्क्यांवर पोहचला होता. 47.54 टिएमसी इतका उपयुक्तसाठा तयार झाला होता. जायकवाडीत काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दोन टीएमसी नविन पाणी दाखल झाले. एक जुन पासुन काल पर्यंत जायकवाडी जलाशयात 26.1 टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. समन्यायी प्रमाणे उपयुक्तसाठा 65 टक्के (50 टीएमसी) आज संध्याकाळ पर्यंत होण्याची शक्यता आहे. गोदावरीतील विसर्ग वाढला आहे. याशिवाय प्रवरा नदी व मुळा नदीतील विसर्ग रात्रीतुन पोहचलेला असेल. प्रवरा नदीतील पाण्याने काल सायंकाळी बेलापूर ओलांडले होते. मार्गातील कोल्हापूर पध्दतीचे बंधार्‍यात काही अंशी पाणी असल्याने जायकवाडीच्या बॅकवॉटर असलेल्या प्रवरासंगम येथे रात्रीतुन पोहचणार आहे. काल प्रवरेवरील ओझर येथे 20 हजार 901 क्युसेक ने विसर्ग मिळत होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *