Saturday, April 27, 2024
Homeनगरगोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी

गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नाशिक (Nashik) कार्यक्षेत्रात पाऊस (Rain) समाधानकारक झाल्याने दारणा (Darana), गंगापूर धरण (Gangapur Dam) भरण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदीला (Godavari River) नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातुन (Nandur Madhyameshwar Dam) पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू आहे. गोदावरी कालवे कोरडेच (Godavari Canal) आहेत तेंव्हा या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोदावरी उजवा (Godavari Canal) आणि डाव्या कालव्यांना तात्काळ ओव्हरफ्लोचे पाणी (Overflow Water) सोडण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (State Secretary of BJP Snehlata Kolhe) यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली होती. त्याप्रमाणे कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

- Advertisement -

कोपरगाव सावळीविहीर फाटा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

स्नेहलता कोल्हे (State Secretary of BJP Snehlata Kolhe) यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचेकडे पाण्याची मागणी (Water Demand) केली होती. निवेदनात म्हटले होते, कोपरगांव तालुका (Kopargav Taluka) कार्यक्षेत्रात यंदाचा पावसाळा उशीरा सुरू झाला. बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्र विस्तीर्ण आहे, पशुधन जगविण्यासाठी हिरव्या चार्‍याची आवश्यकता आहे त्यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी (Godavari Canal OverFlow Water) सोडले तर त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे याभागातील पाण्यांची पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतायांना स्नेहलता कोल्हे यांनी धन्यवाद दिले आहे.

गोदावरीचा विसर्ग 29667 क्युसेकवर!

- Advertisment -

ताज्या बातम्या