Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशगोव्याची एनआयओ करणार राम सेतूचा अभ्यास

गोव्याची एनआयओ करणार राम सेतूचा अभ्यास

नवी दिल्ली –

रामायणात प्रभू रामचंद्रांना श्रीलंकेत जाण्यासाठी वानरसेनेने भारत ते श्रीलंका असा दगडांचा सेतू समुद्रात उभारल्याचे

- Advertisement -

वर्णन आहे. या रामसेतूचा अभ्यास करण्याची संधी गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (एनआयओ) मिळाली आहे.

भारतीय पुरातत्त्व खात्याने याविषयीचा प्रस्ताव मंजुर केला आहे. राम सेतूशी निगडीत दगडांच्या माळेचा अभ्यास करण्याविषयीचा प्रकल्प हा 1 कोटी 35 लाख रुपयांचा आहे. तीन वर्षांसाठी हा प्रकल्प आहे. दरम्यान, रामसेतू मानव निर्मित असू शकतो असे नासाने यापूर्वी सांगितलेले आहे. एनआयओच्या अभ्यासाअंती याबाबत अधिक माहिती मिळेल असे जाणकारांना मत आहे.

सीएसआयआर ह्या पालक संस्थेला एनआयओने पाठविलेला प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व खात्याने विचारात घेतला व आपली मान्यता दिली. यामुळे संशोधनाचा मार्ग खुला झाला आहे.

दोन-तीन प्रकारचे सर्वेक्षण – सुनीलकुमार सिंग

एनआयओचे गोवा संचालक सुनीलकुमार सिंग यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. शास्त्रीय पद्धतीने पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने अभ्यास केला जाईल. राम सेतूचा दगड काढून त्याचा अभ्यास होईल, शिवाय गरजेनुसार समुद्रात रामसेतूच्या जागी ड्रिलिंग वगैरे केले जाईल. दोन-तीन प्रकारचे सर्वेक्षण होईल. भूगर्भ शास्त्राचाही अभ्यास होईल, असे सुनीलकुमार सिंग यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या