Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक मनपाला 'ह्या' लसीचा होणार पुरवठा! शनिवारी होणार स्पष्ट

नाशिक मनपाला ‘ह्या’ लसीचा होणार पुरवठा! शनिवारी होणार स्पष्ट

नाशिक | प्रतिनिधी

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची तयारी नाशिक महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मुंबई व ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ५ जून रोजी कोणत्या लसीचा पुरवठा आणि कोणती कंपनी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याच दरामध्ये संबंधित कंपन्यांकडून तातडीने खरेदी करण्यासाठी प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली…

- Advertisement -

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना लस देणे महत्त्वाचे असून त्याचा पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खरेदी प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली जात आहे.

त्यांना ज्या दरात लस उपलब्ध होईल त्याच दरामध्ये महापालिका खरेदी करेल, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

सध्या तीन लाखांपेक्षा अधिक लसीकरण पुर्ण झाले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून देखील लस उपलब्ध होणार असल्याने मुंबई व ठाणे महापालिकेकडे पहिल्या टप्प्यात पाच लाख लसींची मागणी नोंदविणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटाला प्राधान्य दिले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या