काच गोडावूनला आग, लाखांचेे नुकसान

jalgaon-digital
1 Min Read

धुळे । dhule प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील गुरुद्वाराजवळील धनराज काच दुकानाच्या गोडावून (Glass Godavon) आज सकाळी अचानक आग (fire) लागली. मनपाच्या अग्निशमन बंबांनी अर्ध्या तासात आग विझविली. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र गोडावूनमधील साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

शहरातील गुरूव्दारानजीक महामार्गाला लागून धनराज काच सेंटर व बॉडी मेकरचे दुकान व गोडावून आहे. आज दि. 6 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. याबाबत महापालिका अग्निशामक दल, टोल प्लाझाच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच सोमा टोल प्लाझाचे कर्मचारी दीपक वाघ, टिणू बाबा, सोमनाथ गवळी, योगेश भाई, प्रवीण मानके, मुस्कान खान आणि महापालिका अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन राजन महाले, अतूल पाटील, वाहन चालक सोनू मुर्तडक, वाहिद मिर्झा, सिद्धार्थ खैरनार, राहुल पाटील, गोपाल माळी, फायरमन श्याम कानडे, कुणाल ठाकूर, किरण साळवी, योगेंद्र जाधव हे दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा सुरु केला.

अर्धा तासात अग्निशामक बंबाने सात ते आठ फेर्‍या मारत पाणी मारा करून आग आटोक्यात आणली. याबाबत मोहाडी पोलिसात दुपारी उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *