Friday, April 26, 2024
Homeजळगावकापसाचे नुकसानीपोटी जिनर्स कडून होणार वसुली

कापसाचे नुकसानीपोटी जिनर्स कडून होणार वसुली

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जल्हयात कापूस खरेदी नेहमी फेब्रुवारी अखेर संपुष्टात येते. परंतु यंदा कधी नव्हे तब्बल चार ते पाच महिने इतकी कापसाची खरेदी कोरोना साथरोग प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे लांबली. त्यांनंतर शासनाच्या पणन महासंघ व सीसीआयतर्फे घाईघाईने खरेदी करण्यात आलेला कापूस जिनर्सकडून गाठी बनवण्यात येउन पाठवण्यात आला असला तरी, त्यात जुन्या व नव्या प्रोसेसिंग केलेल्या गाठीच पाठवण्यात आल्या नाहीत तर अचानक आलेल्या पावसामुळे खराब झालेल्या गाठीसुद्धा त्यात आहेत.त्यामुळे जिल्हयातील सर्वच जिनर्सकडून नुकसान भरपाईपोटी वसुली करण्यात येणार असल्याचे वृत्त असून या वृत्ताला सूत्रांनी दूजोरा दिला आहे.

- Advertisement -

जिल्हयात यावर्षी कोरोना साथरोग प्रादूर्भाव होउ नये म्हणून प्रतिबंधात्म उपाययोजनाची अंमलबजावणी अंतर्गत लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे हजारो शेतकर्‍यांचा कापूस घरातच पडून होता.त्यामुळे राज्य शासनाकडून 23 मे रोजी शासन निर्णय पारीत करण्यात येवून शेतमाल खरेदीविक्रीसाठी लॉकडाउनमधून वगळण्यात आले होते. त्यानुसार कापूस, ज्वारी बाजरी खरेदी केंन्दे्र व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधे सोशल व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सवलत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हयातील जिनिंग प्रेसिंगमधे सुमारे 10 लाख 84हजार क्विटल कापसाची खरेदी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, कापूस केन्द्र प्रमुख यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

जळगाव विभागांतर्गत मालेगाव 2, पारोळा व धरणगाव प्रत्येकी 4, धुळे, कासोदा,भडगाव, अमळनेर येथे प्रत्येकी 1 अशा 14 केंन्द्रांवर जून अखेर पर्यत खरेदी करण्यात आलेल्या 10लाख,84हजार क्विंटल कापसाचे चुकारे जिल्हयातील शेतकर्‍यांना पणन महासंघातर्फे अदा करण्यात आले आहेत. आगामी काळात कोरोनामुळे शेतकर्‍यांचे शेतमालाचे तसेच पर्यायाने आर्थीक नुकसान होउ नये यासाठी यंदा कापूस वेचणी हंगाम सुरू झाल्यानंतर लवकरच जास्तीत जास्त कापूस खरेदी केन्द्र सुरू करण्यात येणार असल्याचे पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी सांगीतले.

जिल्हयात यंदा कोरोना साथरोग प्रादूर्भावामुळे कापसाची खरेदी कधी नव्हे इतकी लांबली. मार्चमधे तब्बल दोन वेळा खरेदी स्थगीत करण्यात आली तर मे अखेर जिनींग परीसरात खरेदी करण्यात येणारा कापूस खाली करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने देखिल स्थगीत करण्यात आली. त्यानंतर कापसाला पणन महासंघातर्फे मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी झालेल्या कापसाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती, केन्दप्रमुख यांच्या निष्काळजीपणामुळे जिनिंगच्या क्षमतेपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यात अचानक आलेल्या पावसामुळे साठवलेला कापूस व प्रोसेसिंग झालेल्या कापसाच्या गाठींचे नुकसान झाले आहे. ते नुकसान सीसीआय पणन महासंघ व जिनर्सकडून वसूल करणार आहे.

संजय पवार,राज्य पणन महासंघ संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती बॅक संचालक जळगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या