Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedज्ञानदीप शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

ज्ञानदीप शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

औरंगाबाद – aurangabad

ज्ञानदीप शाळेतील (School) दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे (book) संच भेट देण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाबरा शाखेचे व्यवस्थापक अनिकेत गायकवाड यांनी त्यांचे वडील माधवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ ही भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेश आकडे, वरिष्ठ शिक्षक विनायक पवार आणि कारभारी पगारे, सुमित्रा गायकवाड, पत्रकार पृथा वीर, राहुल दांडगे व अँड. नितीन वाघमारे उपस्थित होते. 

- Advertisement -

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच भेट देताना अनिकेत गायकवाड यांनी मुलांना मेहनतीने व प्रामाणिकपणे पुढे या असे आवाहन केले. अँड. वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. मुल हुशार जरूर असतात. पण इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करतात. इंग्रजी भाषेला आत्मसात करा. इंग्रजी येत असली की आत्मविश्वास वाढतो, असे ते म्हणाले.

अभ्यासासोबतच सामान्य ज्ञान व चालू घडामोडींचा अभ्यास असायला हवा. अवांतर वाचन व दररोज पेपर वाचनाची सवय लावून घ्या, असे पृथा वीर म्हणाल्या. यावेळी शिवदर्शन गायकवाड, अशोक गायकवाड, सचिन गायकवाड, पंकज गायकवाड उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या