Friday, April 26, 2024
Homeनगरघोरपडादेवी मंदिरातील चोरी प्रकरणी राजूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

घोरपडादेवी मंदिरातील चोरी प्रकरणी राजूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील घोरपडादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराला असलेले कुलूप तोडून देवीचे मंदिराच्या गाभार्‍यात असलेली दानपेटी व दानपेटीतील रक्कम चोरणार्‍या तीन चोरट्यांना राजूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

- Advertisement -

दि.07 सप्टेंबर रोजी फिर्यादी विजय विठ्ठल येडे (वय 27, रा. रंधा, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, घोरपडा देवी मंदिराच्या प्रवेशव्दाराला असलेले कुलूप तोडून मंदिराच्या गाभार्‍यात असलेली दानपेटी व दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्याबाबत राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 194/2022 भारतीय दंड संहिता कलम 380, 454, 457 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करून नमूद तीन आरोपी निष्पन्न केले. युवराज मुरलीधर येडे (वय 39, रा. रणद खुर्द, ता. अकोले), विशाल बारकू चव्हाण, (वय 20, सध्या रा. रणद खुर्द, ता. अकोले, मूळ रा. टाकेद बु॥, ता. इगतपुरी, जि. नाशिक) व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडून चोरी गेलेली दानपेटी व रक्कम हस्तगत केली आहे. गुन्ह्यात आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस नाईक दिलीप डगळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या