Friday, May 10, 2024
Homeनगरघोडेगाव तालुक्यासाठी ग्रामपंचायतींची ठराव प्रक्रिया पूर्ण

घोडेगाव तालुक्यासाठी ग्रामपंचायतींची ठराव प्रक्रिया पूर्ण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नगर जिल्हा विभाजनामध्ये प्रस्तावित घोडेगाव तालुक्यासाठी आवश्यक असलेली ठराव प्रक्रिया पूर्ण झाली

- Advertisement -

असल्याची माहिती शाहू फुले आंबेडकर चळवळीचे बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सुधीर वैरागर म्हणाले की, अहमदनगर जिल्हा विभाजनामध्ये घोडेगाव तालुक्याची निर्मिती करून सदर तालुका अहमदनगर जिल्ह्याला जोडावा या मागणीकरिता संबंधित ग्रामपंचायत ठरावाची प्रक्रिया जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार तहसीलदार नेवासा यांनी पूर्ण केली आहे.

घोडेगाव तालुका होऊन अहमदनगर जिल्ह्याला जोडावा यासाठीची प्रस्तावित प्रक्रिया पूर्ण झाल्याने नगर-औरंगाबाद राज्य मार्गावरील घोडेगाव तालुका होण्याची मोठी प्रक्रिया पूर्ण झाल्याने घोडेगाव व परिसरातील सर्व गावांनी आनंद व्यक्त केला आहे. घोडेगाव तालुका झाल्यास सर्वांना सोयीस्कर होणार असून ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

प्रस्तावित घोडेगाव तालुक्यात 53 ग्रामपंचायतींपैकी 42 ग्रामपंचायतींचे ना-हरकत, 9 ग्रामपंचायतीचे हरकत घेतली तर स्वतंत्र तालुक्यासाठी ठराव दाखल झाले यात सोनई व वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतींनी ठराव दिले.

घोडेगाव तालुक्यास हरकत नसलेल्या 42 ग्रामपंचायती

घोडेगाव मंडल – घोडेगाव, झापवाडी, मोरगव्हाण, मांडेगव्हाण, लोहारवाडी, शिंगवेतुकाई, राजेगाव, लोहगाव, मोरयाचिंचोरे, वांजोळी, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, शिंगणापूर, धनगरवाडी.

चांदा मंडल- चांदा, रस्तापूर, कौठा, म्हाळसपिंपळगाव, देडगाव, देवगाव, शहापूर, फत्तेपूर, माका, महालक्ष्मी-हिवरे, तेलकुडगाव, पाचुंदा.

सोनई मंडल – खेडलेपरमानंद, अंमळनेर, करजगाव, पानेगाव, वाटापूर, गणेशवाडी, लांडेवाडी.

वडाळा- बहीरोबा मंडल – माळीचिचोरा, हिंगोणी, कांगोणी, बर्‍हाणपूर, खरवंडी, नारायणवाडी, धनगरवाडी, निपाणी-निमगांव, भानसहिवरा.

हरकत असलेल्या 9 ग्रामपंचायती

घोडेगाव मंडल – पानसवाडी,

सोनई मंडल – शिरेगाव, निंभारी, तामसवाडी, गोमळवाडी.

वडाळा- बहिरोबा मंडळ – रांजणगाव, नागापूर, कोरेगाव, खुणेगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या