Friday, April 26, 2024
Homeनगरघोडेगावात गावरान कांदा 3800 तर लाल कांदा 4 हजार रुपयांपर्यंत

घोडेगावात गावरान कांदा 3800 तर लाल कांदा 4 हजार रुपयांपर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत सोमवारच्या तुलनेत 4 हजार गोण्या घट झाली.

- Advertisement -

गावरान कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 200 तर लाल कांद्याच्या भावात 500 रुपयांनी घट झाली.

काल एकूण 33 हजार 873 गोण्या कांद्याची आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती 4 हजार गोण्या कमी होती. 33 हजार 108 गोण्या गावरान कांदा आला होता. गावरान कांद्याला एक नंबरला 3500 ते 3800 रुपये, दोन नंबरला 2800 ते 3000 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याची 2500 ते 3000 रुपये भावाने विक्री झाली.

लाल कांद्याला कांद्याची काल 765 गोण्या आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला 3500 ते 4000 रुपये दोन नंबरला 3000 ते 3200 रुपये तर तीन नंबरला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. सोमवारी गावरान कांद्याला 4 हजारापर्यंत तर लाल कांद्याला 4500 पर्यंत भाव मिळाला होता. त्या तुलनेत काल बुधवारी 200 रुपये व 500 रुपयांनी घट झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या