Friday, April 26, 2024
Homeनगरघोडेगाव बाजारक्षेत्राचा झापवाडी हद्दीत समावेश

घोडेगाव बाजारक्षेत्राचा झापवाडी हद्दीत समावेश

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजारक्षेत्राचा झापवाडी हद्दीत असलेला समावेश रद्द करण्यात येवून तो घोडेगाव क्षेत्रात करा या मागणीची शासकीय चौकशी पूर्ण झाली असल्याची माहिती घोडेगाव येथील कार्यकर्ते सुधीर वैरागर यांनी दिली.

- Advertisement -

या संदर्भात माहिती देताना वैरागर म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या निर्देशानुसार केलेल्या चौकशी मध्ये महाराष्ट्र – शासन राजपत्र 31 जुलै 1980 मध्ये शासकीय अनुसुची नुसार घोडेगाव या मूळ गावाचे विभाजन करण्यात येऊन झापवाडी आणि घोडेगाव ही दोन नवीन गावे घोषित करण्यात आली. तत्कालिन कामगार तलाठी तसेच मंडळाधिकारी यांनी विभाजनाचे 1998 साली ग्रामपंचायतचे सातबारा उतार्‍यावर गावाच्या नावाची नोंद करताना राजपत्रानुसार शासकीय नोंदी घेतलेल्या नाहीत.

कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा यांच्याकडून उपआवार घोडेगाव येथे जनावरांचा बाजार आणि कांदा मार्केट भरत असलेतरी घोडेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

विभाजन प्रक्रीयेमध्ये मूळ घोडेगावचे बाजार क्षेत्रासह इतर 18 गटाचे शासकीय हस्तांतरण झालेले असून शासकीय स्तरावर बाजार क्षेत्राला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या