Thursday, April 25, 2024
Homeनगरघोडेगाव जनावरांचा बाजार शुक्रवार पासून 'बिगीन अगेन'

घोडेगाव जनावरांचा बाजार शुक्रवार पासून ‘बिगीन अगेन’

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

करोना विषाणूपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी आणि दक्षता-खबरदारी घेण्यासाठी शुक्रवार दि.20 मार्च 2020 पासून बंद आलेला घोडेगाव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार शुक्रवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डीले व उपसभापती वसंतराव देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपआवार घोडेगांव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजारात राज्यातील व परराज्यातील शेतकरी, व्यापारी जनावरे व शेळी-मेंढी खरेदी-विक्री करण्यासाठी येतात.त्यामुळे बाजार आवारात मोठया प्रमाणात गर्दी होते. शासनाचे आदेशानुसार कोरोना विषाणूपासून दक्षता व खबरदारी घेण्यासाठी तसेच संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शुक्रवार दि.20 मार्च 2020 रोजी घोडेगाव येथे भरणार जनावरे व शेळी-मेंढी बाजार बंद ठेवण्यात आलेला होता.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेला लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथिल करून उद्योग,व्यवसाय, बाजार भरविण्यास करोना नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्थीवर परवानगी देण्यात आलेली आहे.

त्या पार्श्वभूमीवर नेवासा बाजार समिती घोडेगाव उपआवारात शुकवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून दर शुक्रवारी घोडेगांव येथील जनावरे बाजार व शेळी मेंढी बाजार सुरू करण्यात येणार आहे. जनावरे खरेदी-विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी यांनी शासनाने कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे प्रत्येकास बंधनकारक राहणार आहे. तरी बाजारात येणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी व परिसरातील नागरिकांनी या विषाणूचा संसर्ग टाळणे व दक्षता घेण्याचे सहकार्य करावे असे आवाहन सभापती कडूबाळ कर्डीले, उपसभापती वसंतराव देशमुख, सचिव देवदत्त पालवे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या