Wednesday, May 8, 2024
Homeनगरघोड नदी पात्रात अवैध वाळू उपसा; बेलवंडी पोलिसांचा छापा

घोड नदी पात्रात अवैध वाळू उपसा; बेलवंडी पोलिसांचा छापा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती. कोल्हेवाडी, राजापूर शिवार येथे घोडनदी पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा होत आहे.

- Advertisement -

त्यानुसार त्यांनी स्वतः पोलीस पथकासह घोड नदी पात्र, कोल्हेवाडी शिवार येथे छापा टाकला असता एक निळ्या रंगाची यांत्रिक बोट वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने तेथे सोडल्याचे आढळून आले. याबाबत पंचनामा करून 9 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची बोटचा जागेवरच पंचनामा करून केली केन, कंटेनरच्या सहाय्याने पोलीस स्टेशनला आणण्यात आली. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशन येथे बोटीचा मालक गोरख बबन पाचर्णे, (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा) व अनोळखी बोट चालक यांच्याविरूध्द गुन्हा रजि. क्रमांक 550/20, भादवि क्रमांक 379, 511, पर्यावरण अधिनियम हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे करीत आहेत. जप्त व सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ आगरवाल यांच्या आदेशान्वये कर्जत विभागाचे पोलीस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरविंद माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे, पोलीस नाईस नंदकुमार पठारे, पोलीस काँस्टेबल दादासाहेब क्षीरसागर, पो. कॉ. संपत गुंड, होमगार्ड काळाणे गोसावी व केदारी यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या