Thursday, April 25, 2024
Homeनगरघोड डाव्या कालव्याचे आवर्तन 1 जानेवारीपासून - आ. बबनराव पाचपुते

घोड डाव्या कालव्याचे आवर्तन 1 जानेवारीपासून – आ. बबनराव पाचपुते

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

घोड डाव्या कालव्याचे आवर्तन 1 जानेवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.

- Advertisement -

पेरूची फोड झाली गोड

घोड डावा कालवा लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून घोड लाभक्षेत्रा खालील शेतकर्‍यांची चालू पिकांसाठी पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी होती. 4 डिसेंबरला जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घोड डाव्या कालव्याचे आवर्तन 10 जानेवारी 2022 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये लाभधारक शेतकर्‍यांकडून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याची तीव्र मागणी होत होती.

जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

यामुळे या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शिरूर या तालुक्याचे आमदार अशोक पवार व कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून आमदार पाचपुते यांनी कुकडी व घोड प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत सूचना केली. या सकारात्मक चर्चेतून 1 जानेवारी पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, घोड डावा लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकर्‍याना न्याय देण्याचे काम नेहमीच करत आलो व करत राहील अशी माहिती आ. बबनराव पाचपुते यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या