घोड कॅनाल पुलाची कड कोसळली

jalgaon-digital
1 Min Read

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

टाकळी रोड इतर जिल्हा मार्ग 141 क्रमांक या रस्त्यावर घोड कॅनाल पुलाचीकड कोसळी असून ओव्हरलोडींग वाहने या रोडवरून भरपूर प्रमाणात वाहत असल्यामुळे 1960 साली बांधकाम झालेला पूल पडण्याच्या मार्गावर आहे.

यामुळे निरपराध लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याने या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नानासाहेब शिंदे यांनी केली आहे

मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता येत असून या रस्त्यावरील साधारणत: दहा किलोमीटर अंतरामध्ये छोटे-मोठे 30 पूल आहेत. त्यामधील हा 1960 साली बांधलेला पूल आता शेवटचा श्वास घेत आहे. या रोडचे ओव्हरलोडींगमुळे रस्त्याचे वाटोळे झालेले आहे.

ओव्हरलोडिंग गाड्या या रोड वरून जाण्यास प्रतिबंध करावे, यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनने सहकार्य करावे, तसेच हा पूल कुठल्याहीक्षणी पडू शकतो आणि त्यात बळी जाण्याची शक्यता आहे. हा पूल घोड कॅनाल अंतर्गत येत असल्यामुळे या पुलाची देखभाल-दुरुस्ती ही सिंचन विभागाने केली पाहिजे, असे मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी सांगतात.

विभागाच्या वादात याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून या पुलाचे काम लवकरात लवकर न झाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष शिंदे यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *