Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश‘भाजप नेते आमच्या व्यासपीठावर दिसले तर एकेकाचे बक्कल काढू’

‘भाजप नेते आमच्या व्यासपीठावर दिसले तर एकेकाचे बक्कल काढू’

नवी दिल्ली / New Delhi – नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-यूपी दरम्यानच्या गाझीपूर सीमेवर बुधवारी भाजप कार्यकर्ते आणि आंदोलनकर्त्यांमध्ये राडा झाला. (Ghazipur Border Clash)

यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचीही तोडफोड झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी इशारा दिला आहे. भाजपे नेते कार्यकर्ते इथे आले तर एकेकाचे बक्कल काढले जाईल. हे शेतकर्‍यांच्या संयुक्त मोर्चाचे व्यासपीठ आहे. यावर कुणीलाही कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये, असे टिकैत म्हणाले.

- Advertisement -

रस्ता सर्वांचा आहे. मात्र शेतकर्‍यांच्या संयुक्त मोर्चाच्या व्यासपीठावर कुणीही कब्जा करू शकत नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांना कुठेही फिरू दिले जाणार नाही. झेंडा लावून व्यासपीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर उपचार केला जाईल, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे.

व्यासपीठावर कब्जा करून कुणाच्याही स्वागताला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते. हे सर्व पोलिसांच्या उपस्थित घडलं आहे. व्यासपीठावर कब्जा करून आपल्या नेत्यांचे स्वागत करून दाखवण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. व्यासपीठ हवे आहे तर मग आंदोलनात सहभागी का होत नाही? असा प्रश्‍न टिकैत यांनी केला.

कुणी आपल्या झेंडा घेऊन येत असले तर त्याला तुम्ही काळे झेडें दाखवले जातील. कुठल्याही गाडीची तोडफोड करण्यात आलेली नाही. हे काम त्यांनी केले आहे. गेल्या 7 महिन्यांत इथून हजारो गाड्या गेल्या. कुठल्याही गाडीवर दगडफेक झालेली नाही, असेही टिकैत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या