Thursday, April 25, 2024
Homeनगरघटस्थापना...नवरात्रोत्सवाला प्रारंभ

घटस्थापना…नवरात्रोत्सवाला प्रारंभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवरात्र उत्सवाचा आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. बुर्‍हानगर येथील जगदंबा माता, केडगाव येथील रेणुका माता, पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी, एमआयडीसीतील रेणुका माता यासह शहरातील मंदिरात घटस्थापनेनंतर महाआरतीने नवरात्रोत्सवाचा जल्लोष झाला. दरम्यान, पुढील 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक संघटनांनी लोकोपयोगी उपक्रम आखले आहेत.

- Advertisement -

जगदंबा माता मंदिर

नवरात्र उत्सवानिमित्त बुर्‍हानगर येथील जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना करून महाआरती करण्यात आली. यावेळी गुरव विजय भगत, अभिषेक भगत, राजेंद्र भगत, किरण भगत, सुभाष भगत, अजिंक्य भगत, कुणाल भगत, कविता भगत, दुर्गा भगत, अंजली भगत, रोहन भगत, संकेत भगत, मनीषा भगत, सुनंदा भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, अमोल जाधव, वेद भगत, गौरी भगत आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेणुकामाता मंदिर

केडगावच्या रेणुकामाता मंदिरात दोन वर्षांच्या खंडानंतर उत्साहात घटस्थापना करण्यात आली. रिमझिम पावसाच्या हलक्या सरींमध्येही पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका, भैरवनाथ मंदिर पुजन, परशुराम पुजन, ध्वजपूजन व ध्वजारोहन झाले. देवीची अलंकार पूजा व महावस्त्र अर्पणानंतर घटस्थापना होऊन नैवैद्य अर्पण व महाआरती झाली. केडगावमधील युवा शेतकरी अनील मोहन ठुबे व अनिता ठुबे या दाम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना व महाआरती करण्यात आली. देवीला पारंपारिक आभुषणे परिधान करण्यात आली होती. मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष देवी यात्रा भरली नाही. यंदा मोठी यात्रा भरत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. आज पहिल्या माळेला रिमझिम पावसातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी पोलिस मदत कक्ष व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिला व पुरूष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा असून मुखदर्शनाचाही सुविधा करण्यात आली आहे.

राधा-कृष्ण मंदिर

पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन सोमवारी सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शीख, पंजाबी भाविकांनी देवीचा जयघोष केला. 56 वर्षापासून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत किर्तन होणार आहे. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होणार आहे. नवरात्रनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता राजेश अलग ग्रुपचा माता की चौकी कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पुर्णाहूती यज्ञ होणार आहे. तर संध्याकाळी सेवाप्रित सोशल फाऊंडेशनच्या वतीने समाजातील महिलांसाठी दांडिया रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या