Friday, April 26, 2024
Homeनगरघरकुलाच्या चेकसाठी ‘भीम गर्जना’चे नगरपालिकेसमोर उपोषण

घरकुलाच्या चेकसाठी ‘भीम गर्जना’चे नगरपालिकेसमोर उपोषण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील गोंधवणी रोड (Godhwani Road), नेहरुनगर (Neharunagar) येथील सचिन नाथा बनकर व नितीन नाथा बनकर यांना घरकूल मंजूर (Home approved) होऊनही घरकुल बांधकामासाठी चेक देण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या कारणावरून भीम गर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने नगरपरिषद कार्यालयासमोर (Municipal Office) कालपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेे.

- Advertisement -

गोंधवणी रोड नेहरुनगर येथील सचिन नाथा बनकर व नितीन नाथा बनकर यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर होऊन बांधकामास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार घरकुलाचे स्लॅबपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून सचिन बनकर व नितीन बनकर यांना प्रत्येकी 60 हजार रुपयांचे चेक मिळाले आहेत. त्यानंतर दुसरा चेक मिळेपर्यंतचे बांधकाम पूर्ण झालेले असून बांधकामाचे फोटो श्री. शिरोळे यांनी काढून नेले आहेत.

सात दिवसांत चेक निघेल असे त्यांनी सांगितले होते. परंतु पुढील चेक न मिळाल्याने चेक मिळणेसाठी दोघांनीही अनेकवेळा संबंधित अधिकार्‍याच्या भेटी घेतल्या असता त्यांनी चेक देण्याबाबत अडचणी सांगितल्या. तुम्ही जागा मोजून घ्या, जो आडवा येतो त्याला तुम्ही भेटा, समझोता करून घ्या, अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देऊन दुसरा चेक देण्यास अधिकारी अडथळे करीत आहेत.

सचिन बनकर व नितीन बनकर यांचे बांधकाम नियमात मंजुरीप्रमाणे चालू आहे. हे दोघेही लाभार्थी मागासवर्गीय समाजातील असल्याने त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. दोन दिवसांत त्यांना पुढील चेक न दिल्यास भीम गर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने या लाभार्थींच्या कुटुंबियांसह नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला होता.

त्यानुसार भीम गर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने फिरोजभाई पठाण, शिवाभाऊ साठे, प्रविण साळवे, रफिक शहा, विश्वास वाघमारे, फिरोज सय्यद, सचिन बनकर व नितीन बनकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, म्हाडा मुंबई, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या