Friday, April 26, 2024
Homeनगरघरकुल ड यादी संदर्भात बेलपिंपळगावात ग्रामसभा

घरकुल ड यादी संदर्भात बेलपिंपळगावात ग्रामसभा

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Bel Pimpalgav

नेनवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शुक्रवारी प्रधानमंत्री घरकुल ड यादी योजना संदर्भात विशेष ग्रामसभा सरपंच निकिता चंद्रशेखर गटकळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

- Advertisement -

घरकुलाच्या लाभासाठी गावातून 905 अर्ज दाखल झाले. त्यापैकी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी गावात सर्व्हे केल्यानंतर 252 नागरिक पात्र ठरले तर ऑनलाईन सर्व्हेत 54 नागरिक अपात्र ठरले. सर्व्हेत ज्या नागरिकांना पक्के घर, अडीच एकर पेक्षा अधिक जमीन तसेच एकत्र कुटूंबात पक्के घर, पुर्वी लाभ मिळालेले 50 हजार ुपयांपेक्षा जास्त सहकारी सोसायटीचे कर्ज असलेले गावातून 603 नागरिक अपात्र ठरले असल्याचे ग्रामसेवक उदय मिसाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर म्हणाले, जिल्ह्यात नेवासा तालुक्यात सर्वाधिक घरकुले मंजूर झाली असून अपात्र ठरलेल्या नागरिकांनी आपण कशामुळे अपात्र ठरलो तसेच काही हरकत असेल तर 21 दिवसात अर्ज करावेत असे आवाहन केले.

चंद्रशेखर गटकळ म्हणाले, कोणावर अन्याय झाला असेल, खरोखर घरकुलाची गरज असेल त्यांचे नाव बसण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

यावेळी उपसरपंच बंडू चौगुले, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, प्रा. रमेश सरोदे, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, पोपट सरोदे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे, वसंत कांगुणे, किशोर गारुळे, बाबासाहेब भांड, गणेश कोकणे, बाळासाहेब तर्‍हाळ, रफिक सय्यद, निलेश कांगुणे, कल्याण शिंदे, नितीन डुकरे, बाळासाहेब शिंदे, संभाजी साठे, नाना शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या