Saturday, April 27, 2024
Homeनगरघारीच्या पुलाची उंची वाढवा- सरपंच जाधव

घारीच्या पुलाची उंची वाढवा- सरपंच जाधव

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, घारी व डाऊच बुद्रुक या तीन गावाला जोडलेल्या नदीवरील पुलाची उंची वाढवा, अशी मागणी घारीचे सरपंच रामदास जाधव यांनी केली.

- Advertisement -

सरपंच जाधव म्हणाले, दोन्ही गावाला जोडणारा पूल पुरातन झाला आहे. या पुलाची उंची कमी आहे. पोहेगाव परिसरात पाऊस झाला की, यावरून पाणी पडते. पर्यायी वाहतूक ठप्प होते. तसेच डाऊच बुद्रुक घारी ग्रामस्थांचा संपर्क चांदेकसारे तसेच कोपरगाव संपर्क या पुलावरून येतो. डाऊच बुद्रुक, घारी येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, दूध टाकण्यासाठी या पुलावरून जावे लागते. पुलावरून पाणी पडल्यास वाहतूक ठप्प होते.

कोपरगाव येथून आलेल्या ग्रामस्थांना चांदेकसारेत वाहने ठेवून या पुलावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी जाधव यांच्यासह किरण पवार, शिवाजी जाधव, अविनाश पवार, रामकिसन काटकर, संदीप पवार, लक्ष्मण पवार, माऊली पवार, यमाजी पवार, रंगनाथ पवार, शिवाजी बर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या