Friday, April 26, 2024
Homeनगरघारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे-नाशिक महामार्गावरील विविध भागांत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील डिझेल चोरी करणारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. त्यातच कुरकुंडी शिवारात शनिवारी (12 फेब्रवारी) पहाटे रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभ्या असलेल्या वाहनातून दीडशे लिटर डिझेल चोरीला गेले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी पार्किंगमध्ये उभे असलेले ट्रक, टेम्पो व इतर वाहनांचे डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून त्यातील डिझेल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

- Advertisement -

याबाबत समजलेली अधिकची माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर कुरकुंडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री एक मालवाहू ट्रक नादुरुस्त झाला. शनिवारी पहाटे अलिशान गाडीतून आलेल्या तरुणांनी टाकीचे लॉक तोडून दीडशे लिटर डिझेल चोरून गेले. चालकाने सर्व प्रकार साईड आरशात पहिला. मात्र माराच्या भीतीचे गप्प बसावे लागले. दोन दिवसांपूर्वी घारगाव बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या वाहनांमधून अशीच डीझेल चोरी झाली होती. चालकांनी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

मात्र पोलिसांनी काही एक ऐकून न घेता त्यांना हाकलून दिले. असे अनेक अनुभव यापूर्वी चालकांना आले आहे. घारगाव पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून जबाबदारी झटकत आहे. पोलिसांनी डिझेल चोरीला गांभीर्याने घेऊन चोरी करणार्‍या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी महामार्गावरील व्यवसायिकांनी केला आहे. अन्यथा याचा परिणाम व्यवसायिकांच्या रोजी-रोटीवर होणार असून पठारभाग बदनाम होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या