Thursday, April 25, 2024
Homeनगरपाचपुतेंची आमदारकी केवळ करमणूक

पाचपुतेंची आमदारकी केवळ करमणूक

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुकक्यात औद्योगिक वसाहत आणणार तर कधी मांडवगण भागात वाखाचा कारखाना काढणार अश्या अनेक घोषणा केल्या मात्र त्या हवेत विरल्या आहेत. आमदार बबनराव पाचपुते यांच्या आमदारकी च्या काळात करमणूक वगळता फारसे काही झालेच नाही.तालुक्यातील प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी म्हणून पाचपुते यांनी कधी पाहिलेच नसल्याने तालुक्यातील अनेक सामान्य प्रश्न आजही तसेच असल्याचे दिसत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार हे सध्या मतदारसंघात गोवोगावी जात असून परिवर्तन संवाद यात्रा करत आहेत. आत्तापर्यत 120 गावात ही यात्रा जाऊन आली आहे. मतदारसंघात रस्ता आणि वीज याच बरोबर तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत. आता घोड धरण लाभ क्षेत्रात असलेली पाण्याची सुबत्ता संपली आहे. मर्यादित भागाला घोडचे पाणी मिळते आहे. कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कांदा अनुदान मिळाले नाही.

कांद्याचे भाव पडले आहेत. अवकाळी अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. सराकारची योजना मिळण्यासाठी गरजेचे पिवळे रेशन कार्ड श्रीमंताकडे आहे. मात्र पिवळे रेशन कार्डपासून गरीब मात्र वंचित आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील प्रश्नाचे आमदारांना गांभीर्य नाही. त्यांचा प्रशासनावावर वचक नाही. यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे. काही ठिकाणी वीज, पाणी आणि रस्ते यासाठी निधी मिळतो पण दर्जेदार काम होत नाहीत.

आपण सत्तेत नसलो तरी लोकांच्या बरोबर आहे. जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधी समाजाच्या प्रश्नकडे दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र दिनापासून हॅलो आण्णा म्हणून अ‍ॅपची सुरुवात करत असून जनतेला आपले प्रश्न यावर मांडता येतील. त्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. काम कोणाला सांगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदारकीचे दावेदार आपणच

2019 साली पक्षाचे आदेश म्हणून लढलो. त्यावेळी तयारी नसताना निसटता पराभव झाला. त्यावेळी विद्यमान आमदारांनी लढायला नकार दिला होता. ऐनवेळी लढा दिला तरी निसटता पराभव झाला. आता आपणच आमदारकीचे दावेदार आहोत. आपली तयारी असल्याचे ही यावेळी शेलार म्हणाले.

नागवडे, पाचपुते यांची आघाडी हे तालुक्याचे दुर्दैव

कारखाना निवडणुकीत विरोधात आता मात्र बाजार समिती निवडणुकीत मांडीला मांडी लावून सत्तेसाठी तडजोड केली जातात. नागवडे,पाचपुते हे सोयीचे राजकारण करतात असा आरोप ही शेलार यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या