Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍याच्या घरातून भरदिवसा 12 तोळे सोने व 6 लाख रुपयांची चोरी

शेतकर्‍याच्या घरातून भरदिवसा 12 तोळे सोने व 6 लाख रुपयांची चोरी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील गेवराई (Gevrai) येथे कांद्याच्या (Onion) शेडमध्ये कांदा भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या घरातून भरदुपारी 12 तोळे सोन्यासह (Gold) 6 लाख रुपयांची रोख रक्कम (Money) घरफोडी (Burglary) करुन चोरुन नेल्याची घटना सोमवारी घडली.

- Advertisement -

याबाबत शिवाजी तुकाराम सतरकर (वय 53) धंदा-शेती रा. गेवराई ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घराची कडी लावून घराजवळ असणार्‍या कांद्याच्या शेडमध्ये कांदा (Onion) भरण्यासाठी मी, माझी पत्नी व गावातील चार मजूर कामगार (Worker) असे आम्ही गेलो होतो. दुपारी दीड वाजण्याया सुमारास माझी पत्नी विजया ही पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरामध्ये गेली असता तिला घराच्या आतमध्ये लोखंडी कपाटाची उचकापाचक करत असताना एकजण दिसला.

वैद्यकीय व्यावसायिकासह चौघांना रॉड, दांडक्याने मारहाण

तिने मोठ्याने आरडाओरड करत घराच्या बाहेर आल्याने मी घराकडे पळत गेलो तेव्हा मला घराच्या बाहेर एक अनोळखी इसम पळताना दिसला. तेव्हा मी त्यास पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माझ्यासोबत झटापट करुन माझे तावडीतून पळून गेवराई (Gevrai) ते कुकाणा (Kukana) जाणार्‍या रोडवर पळून जावून तिथे एक मोटारसायकल (Bike) जवळ असणार्‍या दोन इसमासोबत मोटारसायकवरुन बसून ते तिघेही पळून गेले.

झटापटीत त्यांच्या ताब्यातील मोबाईल व लोखंडी कटावणी जमिनीवर पडली तेव्हा मी व पत्नी विजया असे आम्ही घरात जावून पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटातील माझे कांदा पट्टी, किराणा मालाचे दुकानातील व एलआसीचा भरणा अशी रोख रक्कम सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असे चोरीस गेल्याचे दिसून आले.

दुचाकी अपघातात जवानासह सोनेवाडीतील तरुणाचा मृत्यू

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये (Gold Jewelry) तीन तोळे वजनाचा सोन्याचा सर, चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दोन तोळे वजनाची सोन्याची कर्णफुले, एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी, दोन तोळे वजनाचे कानातील वेल असे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने Gold Jewelry) व 6 लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 764/2023 भारतीय दंड विधान कलम 454, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

निळवंडेत 2500 दलघफू पाणीजिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती बिकट

- Advertisment -

ताज्या बातम्या