Thursday, April 25, 2024
Homeनाशिकईडीसमोर क्लीनचिट मिळवा; पिंगळे यांना दिनकर पाटलांचे आव्हान

ईडीसमोर क्लीनचिट मिळवा; पिंगळे यांना दिनकर पाटलांचे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सेंट्रल गोदावरी (Central Godavari) या संस्थेवर शेतकऱ्यांचा (Farmers) विश्वासघात करणाऱ्या देविदास पिंगळे (Devidas Pingale) यांनी आता यासर्व बाबींवर ईडी (ED) समोर त्याचा खुलासा करावा तेथे क्लिनचिट मिळवावी, असा इशारा दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिला…

- Advertisement -

आमदार, खासदार राहिलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या संस्थेवर डल्ला मारला. शेतकऱ्यांचा विशासघात केला. नाशिक सहकारी साखर कारखाना, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवून टाकली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत इतका भ्रष्टाचार केला की कर्मचाऱ्यांनाही सोडले नाही. त्यामुळे जेलला जावे लागले.

देविदास पिंगळे व त्यांच्या १२ साथीदारांनी माझ्यावर मागील ३ वर्षापूर्वी खोटेनाटे आरोप केले होते. त्यावेळेस मी सेंट्रल गोदावरीमधील देविदास पिंगळेंसह १२ संचालकांवर ५ कोटी रूपयाचा अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केलेला आहे. ती केस अद्याप सूरु असल्याचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

२०१७ पासून ते २०२० पर्यंत संचालक पदावरून आपणास नव्हे तर उलट देविदास पिंगळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचारामुळे सेंट्रल जेलमध्ये होते. तेव्हा तीन मिटींगांना गैरहजर राहिल्यावर त्यांना संचालक पदावरून काढून टाकण्यात आले होते. असा खुलासा पाटील यांनी केला.

बाळासाहेब त्र्यंबक थेटे (Balasaheb Thete) व बाळासाहेब भास्कर वायचळे (Balasaheb Vaichale) या माझ्याबरोबरच्या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना देविदास पिंगळेंच संचालक पद रद्द व्हावे म्हणून पत्र दिले आहे.

यासोबतच जिल्हा उपनिबंधकांकडे नाशिक सहकारी साखर कारखाना व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार अफतातफर केल्यामुळे दोन्हीही संस्था वरखास्त करून प्रशासक बसले होते. त्यामुळे देविदास पिंगळे यांना पुढील १० वर्षे कोणत्याही सहकार क्षेत्रातील संस्थेवर संचालक म्हणून राहता येत नाही. यावर देविदास पिंगळेचे बाजार समिती व सेंट्रल गोदावरीचे संचालक पद रद्द करावे अशी मागणी करणारे पत्र आपण दिले आहे.

देविदास पिंगळे यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणजे मुख्य लेखा परिक्षक यांचा सन २०१३-१४ चा अहवाल ५०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवलेला आहे. तोही अहवाल महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) आहे. त्याचे उत्तर ईडीकडे द्यावे. आणि तेथे खात्रीने क्लिन चिट मिळवा. मग तुम्ही भ्रष्टाचार केला नाही हे सिध्द होईल.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जेवढीही बांधकामे केलेली आहेत. ती बांधकामे कायदेशीर परवानग्या घेऊन केलेली आहेत का? त्याची सर्व माहिती कागदपत्रांसह जनतेसमोर व महापालिकेसमोर (NMC) ठेवा. मग तुम्ही खरे आहे हे सिध्द होईल, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या