Friday, April 26, 2024
Homeनगरजिरेनियम शेतीतून रोजगार निर्मितीवर भर देणार - शालीनीताई विखे पाटील

जिरेनियम शेतीतून रोजगार निर्मितीवर भर देणार – शालीनीताई विखे पाटील

लोणी |प्रतिनिधी| Loni

जिरेनियम लागवडीतून शेतकर्‍यांना व्यावसायिक बनविण्याचे काम होणार आहे. लागवड ते प्रक्रिया उद्योग जनसेवा फाउंडेशन लोणी, केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थान, लखनऊ आणि प्रवरेच्या कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या सहभागातून उभा करताना हे एक मॉडेल होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

जनसेवा फाउंडेशन लोणी, केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थान, लखनऊ (सीमॅप) आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयांच्या प्रक्षेत्रावर जिरेनियम लागवडीच्या शुभारंभप्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी सीमॅप लखनऊचे डॉ. निखिल लोथे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका रूपाली लोढे, प्रा. संदीप पठारे, प्रा. गणेश लबडे, प्रा. योगेश भोसले आदी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जिरेनियम लागवडी बरोबरच यापासून तेल निर्मिती केली जाणार आहे, असे सौ. विखे पाटील यांनी सांगून जिल्ह्यात सीमॅप लखनऊ, जनसेवा फाउंडेशन आणि कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड आणि प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून यातून महिलांना रोजगार दिला जाणार आहे. या उद्योगातून शेतकरी, महिला यांना नवीन तंत्रज्ञानातून ही माहिती दिली जाईल असे सांगितले.

यावेळी सीमॅप डॉ. निखिल लोथे म्हणाले की, सुंगधी आणि औषधी वनस्पती लागवडीमध्ये शेतकर्‍यांना मोठी संधी आहे. यातून या भागातील शेतकरी स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी सीएसआयआर-अरोमा मिशन फेज-2 च्या अंतर्गत शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याकरिता प्रोत्साहित केले जाते आणि याकरिता डॉ. अश्वीन नन्नावरे, डॉ. राजेश कुमार वर्मा यांचे विशेष मार्गदर्शन लाभते. यावेळी सीमॅप बायो-171 आणि कुंती या जिरेनियमच्या वाणांची लागवड मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या