Photo जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम, अंत्ययात्रेला सुरुवात

jalgaon-digital
1 Min Read

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांच्याअंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. ६ लेफ्टनेंट जनरल तिरंगा घेऊन पार्थिव शरीराबरोबर चालणार आहे. १७ तोफांची सलामी देण्यात येणार आहे.

बिपीन रावत यांचं पार्थिव छावणीतील बरार स्व्केअर येथं आणण्यात आलं आहे. जनरल रावत यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. आई-वडीलांचे शेवटचे दर्शन घेतना बिपीन राव यांची मुलगी कृतिका रावत, तारिणी रावत यांना हुंदका आवरणे कठीण झाला होते.

बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सर्व शहीदांचं पार्थिववर दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जनरल रावत यांना अखेरचा निरोप देण्यात येणार असून, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अपर्ण केली.

तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात बिपीन रावत यांच्यासह १३ जण शहीद झाले होते.

सर्वांवर दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनीही शहीद जवानांना श्रध्दांजलीअपर्ण केली.

ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांच्या पत्नीकडे तिरंगा दिला गेला.

Share This Article