Thursday, April 25, 2024
Homeनगरकोल्हारमध्ये तीन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

कोल्हारमध्ये तीन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) कोल्हार (Kolhar) येथे विक्री करण्याचे उद्देशाने तीन गावठी कट्टे (Gavthi Katta) व सहा जिवंत काडतुसे (Live Cartridges) बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारे दोन सराईत आरोपींना (Accused) 91 हजार 800 रूपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) अधिकार्‍यांनी जेरबंद केले आहे. या घटनेमुळे कोल्हार (Kolhar) परीसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

भाजपाने केवळ मराठी बाधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले

भाजपाने केवळ मराठी बाधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेस्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके (LCB PI Anil Katke) जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली, कोल्हार बुद्रुक येथे दोन इसम गावठी कट्टे (Gavthi Katte) व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.पो.नि. दिनकर मुंडे, पो.स.ई. सोपान गोरे, स.फौ.भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ विजय वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पो.ना. शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, पोकॉ रणजीत जाधव व चा.पोना. भरत बुधवंत यांनी गोसावी वस्ती, कोल्हार येथील एका पत्र्याचे शेड जवळ दोन संशयीत इसम अढळून आले.

हळदीच्या कार्यक्रमासाठी चक्क रस्ताच अडवला!

संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले. पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता रविंद्र भाऊसाहेब थोरात रा. कुरणपुर, ता. श्रीरामपूर (Shrirampur) व बाळासाहेब भिमराज थोरात रा. कोल्हार बु, ता. राहाता असे असल्याचे सांगीतले. त्याच्या अंगझडतीमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व सहा जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त (Seized) करण्यात आला आहे.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : बरबटलेली व्यवस्था ‘धन्वंतरी’

दोन्ही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले. आरोपींकडे तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस असा एकुण 91 हजार 800 रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. पोकॉ. रणजीत पोपट जाधव ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाण्यात आर्म ऍक़्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन (Loni Police Station) करीत आहे.

मीटरमध्ये गोलमाल करून वीज चोरी

आरोपी रविंद्र भाऊसाहेब थोरात हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, सदोष मनुष्यवध, मोटर व्हिईकल व आर्म ऍक़्ट प्रमाणे एकुण सात गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या